स्वस्तातला अॅपल आयफोन पाच

लंडन दि.१४ – युवा वर्ग आणि चीन तसेच भारतातील मध्यमवर्गाला नजरेसमोर ठेवून  अॅपलने आपला स्वस्तातला आयफोन पाच लवकरच बाजारात येत असल्याचे जाहीर केले आहे. नेहमीच्या अॅपल स्मार्टफोनच्या तुलनेत हा फोन निम्म्या किंमतीतच उपलब्ध होणार आहे असे जपानी वेबसाईट माकोताकारावर जाहीर करण्यात आले आहे. या वेबसाईटच्या म्हणण्याप्रमाणे हा फोन ३३० डॉलर्समध्येच उपलब्ध होणार आहे आणि तो जानेवारीच्या सुमारास बाजारात दाखल होईल.

सध्या बाजारात असलेल्या आयफोन पाच प्रमाणेच हा फोन दिसत असला तरी त्यातील मुख्य फरक म्हणजे मुळच्या आयफोन पाचसाठी अॅल्युनिमियम बॉडी आहे तर नव्या फोनमध्ये बॉडी प्लॅस्टीकपासून बनविली गेली आहे. रेटिना डिसप्लेही या फोनला देण्यात येत आहे असे समजते. चीन तसेच भारतीय ग्राहकांसाठी सध्याच्या आयफोनच्या किमती खूपच जास्त आहेत. सध्याच्या आयफोन पाच चे हार्डवेअरची सुरवातच ८४९ डॉलर्सपासून आहे.

अॅपल आयफोनच्या किमती चीनी ग्राहकांना अजिबात परवडणार्या  नाहीत. कारण तेथील सरासरी वार्षिक पगार व्यक्तीमागे ३ हजार डॉलर्स इतकाच आहे. त्यामुळे चीनी बाजारपेठेत या उत्पादनांचा खप अगदीच कमी आहे. हे होत असलेले नुकसान भरून काढण्यासाठी स्वस्तातला बजेट आयफोन पाच तयार केला जात आहे असे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.