बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा

मुंबई: राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांनी अखेर संप मागे घेतला आहे. शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या निवेदनानंतर प्राध्यापकांनी बहिष्कार मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

संपकरी प्राध्यापकांच्या तीन मागण्या मान्य झाल्याचे राजेंद्र दर्डा यांनी सांगितले. त्यामुळे प्राध्यापकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे घेतला आहे.

डीएचई सरकारमान्य पदविका ज्येष्ठतेसाठी ग्राह्य धरण्यात यावी, शिक्षिकांचा प्रसूती रजा कालावधी अर्हता सेवा म्हणून ग्राह्य धरावा आणि वेतनेतर अनुदान १ एप्रिल २०१३ पासून देणं, या तीन मागण्या तातडीने मान्य केल्या असून इतर मागण्यांवर तीन महिन्यांच्या आत चर्चा होईल, असंही दर्डा यांनी सांगितले.

त्याचबरोबर पाच जूनच्या आधी निकाल लावला जाईल, असे आश्वासनही दर्डा यांनी दिले.

Leave a Comment