चीनने चोरली भारताची सुरक्षा ‘ई- गुपिते’

नवी दिल्ली: चीनने भारतीय संकेतस्थळात ई- घुसखोरी करून संरक्षण अनुसंधान आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओशी संलग्न सर्व केंद्रातील महत्वाची कागदपत्रे ऑनलाईन हॅकिंगद्वारे लीक केली आहेत. आणि ही माहिती चानने ग्वांगदोंग येथील सर्वरवर उपलोड केली आहे. यापूर्वीही चीनने त्यामुळे भाभारताच्या सुरक्षेबाबत माहिती गोळा करण्यासाठी असा प्रयोग केला होता.

नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन या भारताच्या तांत्रिक गुप्तहेर संघटनेला गेल्या वर्षी आर्मी सायबर पॉलीसी फाईल उघडली असता त्यात फेरफार केल्याचे आढळून आले. अधिक तपास करता ही फाईल डीआरडीओच्या वरीष्ठ अधिकार्‍याच्या ई-मेलमधून चोरली असल्याचे निष्पन्न झाले. तेव्हाचे हॅकिंग आणि आताच्या हॅकिंगमध्ये एकाच प्रकारची सिस्टीम वापरली गेल्याचे उघड झाले आहे.

आजच्या संगणक युगात प्रत्येक क्षेत्रात संगणक अनिवार्य झाला आहे. त्यामुळे जगातील प्रत्येक देश इंटरनेटच्या माध्यमातून कारभार करीत आहेत. मात्र त्याचा धोका वाढत असल्याचे पुढे आले आहे. शेजारील देशातून माहिती गोळा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऑनलाईन हॅकिंग अर्थात हेरगिरी होत आहे आणि यामध्ये चीन राष्ट्र सर्वात पुढे असल्याचे मिडियावर देखरेख ठेवणारी यंत्रणा आरएसएफ त्याच्या एका अहवालात म्हटले आहे.

चीनसह सिरिया, व्हिएतनाम, इराण आणि बहारीनही ऑनलाईन हेरगिरी करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. चीन हा डिजिटल साम्राज्य असणार्‍या देशांपैकी एक असून तेथील कंपन्या किंवा विशेष व्यक्ती सरकारनियंत्रित ब्रॉडबँड सुविधा घेत आहेत. तसेच इंटरनेटच्या देखरेखीसाठी ‘ग्रेट फायरवॉल ऑफ चायना’चा वापर केला जातो. ही यंत्रणा विदेशी साईटस् फिल्टर झाल्यावरंच वापराची अनुमती देते.

Leave a Comment