नवी दिल्ली:ऑगस्टा वेस्टललँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा प्रकरणी माजी हवाई दल प्रमुख एस. पी. त्यागी यांच्यावर केंद्रीय अन्वेषण विभागाने फसवणूक आणि कट रचण्याचे गुन्हे दाखल केले आहेत.
नवी दिल्ली:ऑगस्टा वेस्टललँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा प्रकरणी माजी हवाई दल प्रमुख एस. पी. त्यागी यांच्यावर केंद्रीय अन्वेषण विभागाने फसवणूक आणि कट रचण्याचे गुन्हे दाखल केले आहेत.
एअर चीफ मार्शल त्यागी यांच्या सह ४ कंपन्या आणि १० व्यक्तींवर सीबीआयने गुन्हे दाखल केले असून त्यात माजी केंद्रीय मंत्री संतोष बगरोडीया यांचे बंधू सतीश यांचाही समावेश आहे.
अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टर खरेदी करण्याच्या सुमारे ३ हजार ६०० कोटी रुपयांच्या व्यवहारात सुमारे ३६० कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे. या घोटाळ्याची चौकशी सीबीआय करीत आहे. या प्रकरणी ऑगस्टा वेस्टलँड आणि तिची मातृकंपनी असलेल्या फिनमेक्कानिका या इटलियन कंपनीच्या दिल्ली येथील कार्यालयातही चौकशी केली जात आहे.
या प्रकरणी कंपनीला अनुकूल बदल करून पुन्हा निविदा मागविण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप त्यागी यांच्यावर आहे; तर बगरोडीया यांच्या आयडीएस इन्फोटेक या कंपनीमार्फत लाचेच्या रकमेसाठी हवाला देण्यात आल्याचा आरोप आहे. हवाईदल प्रमुखांच्या तिघा चुलत भावंडांचाही आरोपीत समावेश आहे.