लिटरमध्ये १०० किमी धावणारी जर्मन कार

जर्मन कार मेकर व्होक्सवॅगन कंपनीने भविष्यातली लिटरपेक्षा कमी इंधनात तब्बल १०० किमी जाऊ शकणारी कार जिनिव्हा कार प्रदर्शनात सादर केली आहे. ही दोन सीटर, डिझेल व इलेक्ट्रीक हायब्रिड इंजिन असलेली कार १२ डॉलर्स किमतीचे इंधन भरले तर ऑस्ट्रेलियातील सिडने ते मेलबोर्न हे अंतर कापू शकणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

मोस्ट एक्झॉटिक असे वर्णन केलेली ही गाडी रस्त्यावर सर्वाधिक मायलेज देणारी जगातील पहिली कार आहे. एक्स एलवन असे नामकरण केलेल्या या गाडीचे वजन अत्यंत कमी ठेवण्यात आले असून तिची बॉडी कार्बन फायबर प्लॅस्टीकपासून बनविली गेली आहे.  तिच्या युरोपियन रस्त्यांवर यशस्वी चाचण्याही केल्या गेल्या आहेत. ही गाडी ०.९ लिटर म्हणजे १ लिटरपेक्षाही कमी इंधनात १०० किमी जाते. यामुळेच केवळ १० लिटरची इंधन टाकी असलेली ही गाडी ५०० किमीचा प्रवास आरामात करतेच पण तिच्यातून होणाऱ्या कार्बन उर्त्सजनाची पातळीही अगदी कमी आहे असा उत्पादकांचा दावा आहे.

वास्तविक २०११ मध्येच प्रथम ही गाडी डिस्प्ले केली गेली होती. मात्र आता कंपनी त्यांच्या व्होक्ट कार्बिअेलेट व पोश्च बॉक्सर या दोन मॉडेलबरोबरच या गाडीची लिमिटेड एडिशन काढणार आहेत. पुढच्या महिन्यात हे उत्पादन सुरू होईल असे कंपनीच्या अधिकाऱ्यानी स्पष्ट केले आहे.

Leave a Comment