तेहरान दि. १३ – इराणमधील कर्मठ धर्मगुरूंनी अध्यक्ष मोहमूद अहमदिनेजान यांच्या वर्तणुकीबद्दल त्यांच्यावर टीकेची झोड उठविली असून परदेशात वागताना अध्यक्षांना इस्लामी कायद्याचे पालन केले जावे यासंबंधीच्या सक्त सूचना दिल्या जाव्यात असाही फतवा काढला आहे.

व्हेनेझुएलाचे अध्यक्ष ह्युगो चावेझ यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या अहमदिनेजान यांनी चावेझ यांच्या मातोश्रींचे हात धरून त्यांचे सांत्वन करताना त्यांना जवळ घेतल्याने इराणी धर्मगुरू संतापले आहेत. अहमदिनेजान यांनी चावेझ यांच्या आईला जवळ घेतल्याचा फोटो वाऱ्याच्या वेगाने इंटरनेटवरून जगभर प्रसारित झाल्यानंतर इराणी धर्मगुरूंना संताप आवरणे अवघड बनल्याचे सांगण्यात येत आहे.
इराणमध्ये इस्लामी कायद्याचे काटेखोर पालन केले जाते. या कायद्यानुसार परस्त्री मग ती कितीही वर्षाची असो, तिला स्पर्श करणे म्हणजे पाप समजले जाते. चावेझ यांच्या मातोश्री ही अहमदिनेजान यांच्यासाठी परस्त्री आहेत. इस्लाम कायद्यानुसार कोणतीही परकी महिला पाण्यात बुडत असेल अथवा तिला वैद्यकीय मदतीची गरज असेल तरच पुरूष तिला स्पर्श करू शकतात. मात्र येथे असा कोणताही प्रकार नसल्याचे अहमदिनेजान यांनी इस्लाम कायदा तोडल्याचा या धर्मगुरूंचा दावा आहे.
यापूर्वीही अहमदिनजान यांनी ह्यूगो चावेझ यांच्या उल्लेख संत महात्मा असा केल्यानेही इराणी धर्मगुरू संतापले होते. जिझस ख्राईस्ट आणि ९ व्या शतकात होऊन गेलेले इमाम महदी यांच्याप्रमाणेच ह्युगो पृथ्वीवर परत जन्मास येतील असे वक्तव्य अहमदिनेजान यांनी केले होते.