हसन अलीला न्यायालयीन कोठडी

पुणे:मनी लॉंडरिंग आणि बनावट पासपोर्टप्रकरणी अटकेत असलेला घोडे व्यापारी हसन अली याला सोमवारी पुण्यातील न्यायालयात अन्य एका आरोपाखाली हजर करण्यात आलं.

काळा पैसा परदेशात पाठवण्याच्या आरोपाखाली पुण्यातील घोडे व्यापारी हसन अलीला मुंबईतील आर्थर रोड कारागृहातून पुण्यात आणण्यात आले. पुण्यात राहत असताना हसन अलीने त्याचा पासपोर्ट नूतनीकरण करताना बनावट कागदपत्र सादर केल्याचा आरोप आहे.

हसन अलीने आणखी दोन पासपोर्ट असल्याची माहिती देखील दडवून ठेवल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. अंमलबजावणी संचालनालयाकडून हजारो कोटी रुपयांच्या मनी लॉडरिंग प्रकरणी हसन अलीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर हसन अली मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आहे.

Leave a Comment