नेवी दिल्ली: ऑस्कर विजेता चित्रपट निर्माता स्टिव्हन स्पिलबर्ग आता काश्मिर मुद्दयावर चित्रपट बनविण्याच्या विचारात आहे. तो म्हणतो चित्रपटाची कहाणी तयार असल्याचे स्पिलबर्गने सांगितले.

नेवी दिल्ली: ऑस्कर विजेता चित्रपट निर्माता स्टिव्हन स्पिलबर्ग आता काश्मिर मुद्दयावर चित्रपट बनविण्याच्या विचारात आहे. तो म्हणतो चित्रपटाची कहाणी तयार असल्याचे स्पिलबर्गने सांगितले.
हा चित्रपट भारत-पाक सीमेवरील काश्मिर वादावर आधारीत असून त्यासाठी स्पिलबर्ग योग्य दिग्दर्शक आणि कलाकारांच्या शोधात आहे. स्पिलबर्गने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत २७ चित्रपट तयार केले आहेत.
काश्मिरवरील चित्रपटाविषयी अधिक माहिती देताना स्पिलबर्ग सांगतो की, त्याचा ड्रीम होम स्टुडिओ आणि मुंबईतील रिलायन्स एंटरटेन्मेंटद्वारे हा चित्रपट निर्माण कला जाणार आहे. तसेच स्पिलबर्गने फ्रेंच सम्राट नेपालियनवर एक दूरचित्रवाणी मालिका बनविणार असल्याचेही नुकतेच घोषित केले आहे.
दरम्यान उद्योगपती अनिल अंबानी यांनी आयोजित केलेल्या मेजवानीत स्पिलबर्ग अभिनयाचे शेहेनशाह अमिताभ बच्चन याना भेटला. या भेटीबाबत अमिताभने ट्विट कले आहे.