इस्लामाबाद: पाकिस्तानने दहशतवादीविरोधी अभियान राबविल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा तालिबानने पाकिस्तानला दिला आहे.

इस्लामाबाद: पाकिस्तानने दहशतवादीविरोधी अभियान राबविल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा तालिबानने पाकिस्तानला दिला आहे.
पाकिस्तानचे गृहमंत्री रेहमान मलिक यांनी नुकतेच स्पष्ट केले होते की, सरकारने दहशतवादाचा पुरेपूर बंदोबस्त केला असून त्याला सरकारची परिणामकारक रणनीती कारणीभूत आहे. तसेच दहशतवादाविरोधात सर्व जनतेने एकत्र येण्याची गरज असल्याचे मलिक बोलले होते.
त्यांच्या या वक्तव्यावर तालिबानने तहरिक-ए-तालिबानद्वारे पाकिस्तानला इशारा दिला आहे. तसेच पाकिस्तानच्या वायूसेनेने हवाई हल्ले रोखावे आणि अमेरिकेकडून होणारे ड्रोन हल्ले रोखण्यास तालिबानला मदत करावी; असेही तालिबानने म्हटले आहे.
यापूर्वी पाकिस्तानी सरकारने तालिबानपुढे शस्त्र खाली ठेऊन शांतीपूर्ण चर्चा करण्याचा प्रस्ताव मांडला होता, मात्र तो तालिबानने नाकारला.