साडी लूकमधून विद्या आली बाहेर

गेल्या काही दिवसापासून अभिनेत्री विद्या बालन आणि साडी असे समीकरण झाले होते. लग्नानंतर तर प्रत्येक कार्यक्रमात विद्या साडी घालूनच झळकत होती. त्यामुळे ती खुपच सुंदर देखील दिसत होती. आगमी काळात येत असलेल्या ‘घनचक्कर’ या सिनेमात विद्या या साडी लुक मधून बाहेर पडलेली दिसणार आहे. लग्नानंतर विद्या पहिल्यांदाच पंजाबी लुकमध्ये झळकणार आहे.

‘घनचक्कर’ या सिनेमात विद्या इमरान हाशमी सोबत पंजाबी हाउस वाइफची भूमिका करीत आहे. जास्तीत जास्त काळ ‘घनचक्कर’ या सिनेमात अभिनेत्री विद्या डार्क आणि ब्राइट कलरची सलवार कुर्तीमध्ये दिसणार आहे. या सिनेमात विद्याची भूमिका कशी चांगली होईल याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. विद्याचा लग्नानंतरचा हा पहिलाच सिनेमा असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या सिनामचे डायरेक्टर राजकुमार गुप्ता म्हणाले, ‘ या सिनेमातील विद्याचा लुक खूपच सुंदर असा आहे. हा सिनेमा आम्ही विद्याच्या लुकवरूनच प्रमोशन केला जात आहे.’ सूत्राने दिलेल्या माहितीनुसार या सिनेमात विद्याने जे ड्रेस परिधान केले आहेत. त्या सर्व ड्रेसचे आगमी कळत प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. त्यामुळे तिचे हे ड्रेस चाहत्यांना पाहण्यासाठी सहजपणे उपलब्ध होणार आहेत.

Leave a Comment