आता आरामात जगा दीडशे वर्ष

लंडन: वाढत्या वयामुळे प्रत्येकाच्या मनात काळजीचा सूर असतो. मात्र आता वाढत्या वयाचे मानवी शरिरावर होणार्‍या परिणामांचा वेग मंदावणार असून माणसाचे आयुष्य दीडशे वर्षापर्यंत वाढणार आहे. त्यासाठी औषध तयार करण्यात यश आल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे.

हार्वर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक डेव्हिड सिंक्लेअर यांनी हे औषध तयार केले असून, फार्मास्युटिकल्स संस्था जीएसके ही सध्या रुग्णांवर त्याचा प्रयोग करीत आहे. या औषधात प्रोटीनच्या वाढीद्वारे वय वाढीचे परिणाम कमी करण्यासाठी रेड वाईन मध्ये सापडणारे जैविक रसायन वापरण्यात आले आहे. त्या औषधाला एसआयआरटी १ असे संबोधण्यात आले आहे.

हे औषध घेतल्याने ते आपल्या पेशींची संख्या वाढवते आणि त्यांच्या वयाच्या वाढीचा वेग मंद करते. या औषधाचा प्रथम प्रयोग उंदीर, मधमाशी यांच्यावर करण्यात आला असून त्यांचे आयुष्यमान वाढलेले दिसून आले; अशी माहिती सिंक्लेअर यांनी दिली.

सिंक्लेअर यांचा दावा आहे की हे औषध थेट आरोग्यावर परिणाम करीत असून आता याचा वापर कॅन्सर, हृदय विकार, मधुमेह, मोतीबिंदू आदी आजारांवर करण्यात येणार आहे असेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment