सौदीत शिरच्छेद करण्यासाठी मिळेनात तलवारबाज

रियाध दि. ११ – सार्वजनिक रित्या गुन्हेगाराला शिरच्छेदाची शिक्षा देणारा जगातील एकमेव देश असलेल्या सौदी अरेबियात आता सार्वजनिक शिरच्छेद यापुढे केले जाणार नाहीत असे समजते. यामागचे कारण म्हणजे डोकी उडविणार्याक तयार तलवारबाजांची चणचण सौदीला जाणवत आहे. त्यामुळे ही शिक्षा बंद होणार असल्याचे अलवतन या सौदी वर्तमानपत्राने म्हटले आहे.

मात्र असे असले तरी गुन्हेगारांना मृत्युदंड मिळालाच पाहिजे या देशाच्या विचारसरणीत कोणताही बदल झालेला नाही. सशस्त्र दरोडा, अमली पदार्थ तस्करी, बलात्कार, खून असे गुन्हे करणार्यान गुन्हेगारांना सार्वजनिक ठिकाणी शिरुच्छेदाची शिक्षा सौदीत दिली जाते. त्याऐवजी आता तुरूंगातच त्यांना विषाचे इंजेक्शन दिले जावे अशी मागणी केली जात आहे. अन्यथा गुन्हेगारांना गोळ्या घालून मारण्याचा पर्यायही सचविला जात आहे.

या वर्षात आत्तापर्यंत सौदीत १५ जणांचा शिरच्छेद केला गेला असून गेल्या वर्षात ७६ जणांना सार्वजनिक ठिकाणी शिरच्छेदाची शिक्षा दिली गेली होती असेही समजते.

Leave a Comment