टेक्स्ट मेसेज करा आणि सेलफोन चार्ज करा

लंडन दि. ११ – ग्रामीण भागात असलेली वीजेची चणचण, अथवा दुर्गम भागात वीजच नसणे हा प्रकार आशिया आणि आफ्रिकी देशात नित्याचा आहे. मात्र या भागात मोबाईल वापरणार्यांकची संख्या मात्र झपाट्याने वाढते आहे. मोबाईलचे चार्जिंग संपले आणि वीज नसेल तर काय करणार हा प्रश्न मोबाईल धारकाला नेहमीच पडतो. त्यावर लंडनमधील बफेलो ग्रीड कंपनीने उत्तर शोधले आहे. केवळ एक टेक्स्ट मेसेज पाठवून युजरला आपला मोबाईल चार्ज करून घेण्याची व्यवस्था कंपनीने केली असून त्याची यशस्वी चाचणी युगांडात घेण्यात आली असल्याचे समजते.

कंपनीने त्यासाठी सोलर पॉवर्ड सेलफोन चार्जिंग स्टेशन निर्माण केले असून हे स्टेशन टेक्स्ट मेसेच पाठवून अॅक्टिव्हेट करता येते. या केंद्रावर असलेली सोलर पॉवर बॅटरी आणि मॅक्झिम पॉवर पॉईंट ट्रॅकिग हे तंत्रज्ञान यासाठी उपयुक्त ठरते. हवामानातील तपमान, सूर्यप्रकाश यांचा योग्य अंदाज घेऊन ग्राहकाकडून टेक्स्ट मेसेज आला की या उपकरणातील एलइडी लागतो व त्यावरच मोबाईल चार्ज होतो. या प्रक्रियेसाठी सध्या दीड तासाचा वेळ लागतो मात्र तो आणखी संशोधनातून कमी करता येईल असा कंपनीचा दावा आहे.

बफोलो ग्रीड पूर्ण चार्ज असेल तर ते तीन दिवस सुरू राहते व दिवसाला त्यावर ३० ते ५० सेलफोन चार्ज होऊ शकतात. त्यावर १० चार्जिंग पॉईंट दिले गेले आहेत. सध्या यासाठी ११० शिलिंग पर चार्जिंग असा खर्च येतोय मात्र तोही कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

Leave a Comment