‘जंजीर’मध्ये प्रियंकाचा हटके लूक

बॉलीवुड अभिनेत्री प्रियंका चोप्रा जंजीरच्या रीमेक मध्ये दोन वेगळ्या भूमिका साकरणार आहे. ती या सिनेमात दोन वेगळ्या लुकमध्ये दिसणार आहे. ही सर्व माहिती प्रियंकाची ड्रेस डिजाइनर प्रिया कटारिया-पुरी हिने दिली.अपूर्व लखिया दिग्दर्शित या सिनेमात प्रियंका चोप्रा माला नावाच्या एका मुलीची रोल करीत आहे.

याबाबत अधिक माहिती देताना प्रिया कटारिया म्हणाली, ‘सिनेमाच्या पहिल्या पार्टमध्ये विदेशात राहत असलेल्या एक महिला उद्योजकाचा रोल तिने साकारला आहे, तर दुस-या भगत तिने भारतात विमानतळावर काम करणा-या टीप-टॉप आणी व्यवस्थितत दिसत असलेल्या युवतीचा रोल साकारला आहे. भारतात आल्यानंतरच्या प्रियंकाच्या लूक मध्ये बदल होणार आहे.’

माला प्रमाणे मी सुद्धा विदेशात राहणारी अनिवासी भारतीय महिला आहे. त्यामुळे या युवतीने कशा प्रकारचे ड्रेस घालायला हवा आहे.याची पूर्ण कल्पना मला आहे. त्यामुळे प्रियंका करीत असलेल्या दोन रोल साठी मी सुट होतील असे ड्रेस फायनल केले आहेत. त्यामुळे दोन्ही रोलमध्ये प्रियंकाचा लूक हा परफेक्ट असणार असल्याचे प्रियाने सांगितले.

Leave a Comment