चावेज यांच्यावर विषप्रयोगः मोरालेस

काराकास: व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती ह्युगो चावेज यांचा मृत्यू कॅन्सरने न होता त्यांची विष घालून हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप बोलिवियाचे राष्ट्रपती एवो मोरालेस यांनी केला आहे. त्यामुळे सावेज यांच्या मृत्यूला वेगळे वळण लागले आहे. यामागे सीआयएवर संशयाची सूई असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

चावेज यांच्या अंत्यसंस्कारासाठी मोरालेस काराकास येथे आले होते. दरम्यान त्यांनी हे वक्तव्य करून खळबख पसरवली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, ह्युगो चावेज हे लॅटिन अमेरिकेतील असे नेते होते की जे अमेरिकेच्या विरोधात बोलण्यास कचरत नसत. चावेज यांच्या हत्येमागे सीआयएचा हात असल्याचे बालले जात आहे.

सीआयए ने क्युबाचे राष्ट्रपती फिडेल कॅस्ट्रो यांना मारण्याचा अटोकाट प्रयत्न केला होता. कारण तेही अमेरिकेला अडथळा ठरत होते. असेही बोलले जात आहे.

चावेज यांच्या अंत्यविधीला ३० पेक्षा अधिक देशांचे राष्ट्रपती हजर होते. चावेज यांनी चौदा वर्ष देशाचे नेतृत्व केले. दरम्यान त्यांना कॅन्सर झाला आणि त्यांचे वयाच्या ५८ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या नंतर उपराष्ट्रपती निकोलस मदुरो यांना राष्ट्रपती करण्यात आले आहे.

Leave a Comment