बॉलीवुड अभिनेत्री ईशा गुप्ताला सिनेमा क्षेत्रात पाय ठेऊन अजून काही दिवससुद्धा उलटले नाहीत. आतापासुनच तिने नखरे दाखविण्यास सुरुवात केली आहे. मात्र तिने सिनेमाची निवड करीत असतना दिग्दर्शका समोर अटी ठेवण्यास सुरुवात केली आहे. तिच्या मते अभिनेत्री विद्या बालनप्रमाणे एकाद्या सिनेमची पूर्ण जबाबदारी खांद्यावर घेण्यास तयार नाही. अशा प्रकारचा सिनेमा करायला तिला आवडत नाही.
नायिका प्रधान सिनेमा करणार नाही-ईशा गुप्ता
ईशाने विशेष बैनरचा ‘जन्नत-२’ या सिनेमाच्या माध्यमातून बॉलीवुडमध्ये इंट्री केली आहे. त्याशिवाय ईशाने ३डी ‘राज’ या सिनेमात काम केले आहे. दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या ‘चक्रव्यूह’ या सिनेमात देखील तिने एक महत्वपूर्ण भूमिका केली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून बॉलीवूडमध्ये तिचा भाव चांगलाच वधारला आहे.
याबाबत अधिक बोलताना ईशा म्हणाली, ‘ तसे पहिले तर मला आगामी काळात सर्वच प्रकारची सिनेमे करायची आहेत. मात्र मला सुरुवातीपासून सर्वच जबाबदारी स्वतावर घ्याची सवय नाही, त्यामुळे काम करीत असताना मी काही मर्यादा घालून घेतल्या आहेत. त्यामुळे आता तरी मी नायिका प्रधान सिनेमा करणार नाही.’