नागपूर: नक्षलप्रभावित गडचिरोली जिल्हयात सोमवारी पोलीस व नक्षलवाद्यांदरम्यान चकमक उडाली. जंगलात गस्तीवर असलेल्या पोलीस पथकावर नक्षलवाद्यांच्या एका गटाने गोळीबार केला.
नागपूर: नक्षलप्रभावित गडचिरोली जिल्हयात सोमवारी पोलीस व नक्षलवाद्यांदरम्यान चकमक उडाली. जंगलात गस्तीवर असलेल्या पोलीस पथकावर नक्षलवाद्यांच्या एका गटाने गोळीबार केला.
सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास धानोरा तालुक्यातील फुलबोडी गटांतर्गत येणार्या पध्दाबोरिया जंगलात नक्षलवाद्यांनी पोलीसांवर अंदाधुंद गोळीबार केला. पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. मात्र दोन्ही बाजूने झालेल्या या गोळीबारात कुणीही जखमी झाले नाही.
घनदाट जंगलाचा फायदा घेत पलायन करण्यात नक्षलवाद्यांनी यश मिळविले.