लोकसेवा आयोगाची परीक्षा प्रादेशिक भाषेतून असावी – राज ठाकरे

मुंबई: युपीएससी म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा प्रादेशिक भाषांतून घेण्याची असलेली अनुमती नुकतीच बंद करण्यात आली आहे. ही परीक्षा केवळ इंग्रजी आणि हिंदीतूनच घेण्याची सक्ती केली जात आहे; त्याबद्दल महाराष्ट्रातील खासदारांनी केंद्र सरकारकडे आवाज उठवावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे.

यापूर्वी मराठीसह अन्य प्रादेशिक भाषांतून ही परीक्षा देण्याची मुभा होती. परंतु आता मात्र प्रादेशिक भाषेतून ही परीक्षा द्यायची असेल तर विचित्र अटी घालण्यात आल्या आहेत. संबंधित विद्यार्थ्याने पदवीपर्यंतचे शिक्षण मातृभाषेतूनच घेतले असले पाहिजे आणि ही परीक्षा मातृभाषेतून देण्याची तयारी एका केंद्रावर किमान २५ विद्यार्थ्यांनी दाखवली असली पाहिजे; तरच या विद्यार्थ्यांना मातृभाषेतून परीक्षा देण्याची मुभा देण्यात येईल; असे नोटीफिकेशन काढण्यात आले आहे.

त्यावर राज ठाकरे यांनी टीका केली आहे. शिवसेनेचे खासदार भारतकुमार राऊत यांनी राज्यसभेत याबाबत आवाज उठवला होता. आता मनसेनेही हा विषय हाती घेतला आहे.

Leave a Comment