लादेनचा जावई अमेरिकेच्या ताब्यात

वॉशिंग्टन: क्रूरकर्मा दहशतवादी ओसामा बिन लादेनचा जावई सुलेमान अबू गैथ हा अमेरिकेच्या हाती लागला आहे. तो ओसामाचा प्रवक्ता आणि अतिरेकी संघटना अल कायदाच्या मुख्य नेत्यांपैकी एक असल्याचे मानले जात आहे. सुलेमानच्या अटकेने अनेक अतिरेकी डावपेच उलगडण्याची शक्यता आहे.

सुलमानला तुर्कीच्या सुरक्षा दलाने अटक केली असून तुर्कीच्या अधिकार्‍यांना या सुलेमानची माहिती वॉशिंग्टनमधून प्राप्त झाली असल्याचे तेथील स्थानिक वृत्तपत्र हुरियतने प्रसिद्ध केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सुलेमान बनावट पासपोर्टच्या आधारे इराणहून तुर्कस्तानला आला होता. त्यामुळे तुर्कीच्या अधिकार्‍यांनी सुलेमानवर सीमा उल्लंघन केल्याचा आरोप लावला असून ते त्याला इराणला पाठवित होते.

मात्र अतिरेकी डावपेच जाणून घेण्यासाठी सुलेमानची अधिक चौकशी करण्यासाठी अमेरिकेने त्याला आपल्या ताब्यात देण्यास तुर्कस्तान सरकारला सांगितले. त्यानुसार तुर्कीने सुलेमानला अमेरिकच्या हवाली केले आहे.

Leave a Comment