नवी दिल्ली: राजधानीत बलात्कारांची मालिका सुरूच असून रविवारी भाजी आणण्यासाठी बाजारात गेलेल्या दहा वर्षाच्या बालिकेचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचे प्रकरण उघड झाले आहे.

नवी दिल्ली: राजधानीत बलात्कारांची मालिका सुरूच असून रविवारी भाजी आणण्यासाठी बाजारात गेलेल्या दहा वर्षाच्या बालिकेचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचे प्रकरण उघड झाले आहे.
पीडीत मुलगी तुघलखाबाद एक्स्टेन्शन येथे राहत असून गोविंदपुरी येथील प्राथमिक शाळेत शिकते. ती भाजी आणण्यासाठी बाजारात निघाली असता तिच्या बाजूला राहण्याऱ्या एका युवकाने तिला जबरदस्तीने रिक्षात घेतले. तिने मुस्काडीत मारल्याने आपल्या भाच्याला ऐकायला येत नसल्याचा आरोप करून त्या युवकाने मुलीला धमकावले आणि तिला रिक्षेतून तुघलखाबाद परिसरातील जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
या प्रकाराबद्दल वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याने ही मुलगी गप्प राहिली. मात्र तिची अस्वस्थ मन:स्थिओतॆ लक्षात घेऊन कुटुंबियांनी चौकशी केली असता तिने आपल्यावरील अत्याचाराची माहिती दिली. त्यानुसार तिच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार दिली असून तिच्यावर बलात्कार झाल्याचे वैद्यकीय तपासणीत उघड झाले आहे.