दर्शनावेळी उत्तर प्रदेशमध्ये चेंगरा-चेंगरी; दोघे ठार

बाराबंकी- महाशिवरात्रीनिम्मित दर्शन घेण्यासाठी गर्दी झाल्याने मंदिरात झालेल्या चेंगरा-चेंगरीत दोन भाविकांचा मृत्यू झाला तर दहा जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी सकाळी उत्तर प्रदेशमधील बाराबंकी जिल्ह्यातील लोधेश्वर महादेव मंदिरात घडली. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार येत्या काळात मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

रविवारी महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी लोधेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. यावेळी जलाभिषेक करण्यासाठी भाविकांमध्ये चढाओढच लागली होती. एकाच ठिकाणी प्रचंड गर्दी झाल्याने त्याठिकाणी चेंगराचेंगरी झाली. त्यामध्ये दोन भाविक जागीच ठार झाले तर अन्य दहा जण गंभीररित्या जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यामधील काहीची प्रकती चिंताजनक आहे. मृतांची ओळख पटविण्याचे काम पोलिस करीत आहेत.

घटनास्थळी उपस्थितअसलेल्या काहीजननी सांगितले की, मंदिर परिसरात भाविकांसाठी रांगेची व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठी सर्वत्र बॅरिगेटस् लावण्यात आले होते. एकदम गर्दी झाल्यामुळे बॅरिगेटस तुटल्याने एकच गोंधळ उडाला. त्यामुळे नागरिकाची चेंगराचेंगरी झाली. घटनेनंतर याठिकाणी पोलीसाची मोठी कुमक दाखल झाली असून जखमींना तातडीने हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.

Leave a Comment