अमेरिकेत भारत आवडते तर पाकिस्तान नावडते राष्ट्र

वॉशिंग्टन: अमेरिकेतील नागरिकांना भारत राष्ट्र आवडते तर पाकिस्तान हे राष्ट्र नावडते आहे. येथे घेण्यात आलेल्या गॅलप सर्वेक्षणाच्या अहवालानुसार आवडत्या राष्ट्रांमधून कॅनडा, ग्रेट ब्रिटन, जर्मनी, जपान आणि फ्रान्सनंतर भारताचा सहावा क्रमांक लागतो.

अमेरिकन नागरिकांच्या नावडत्या राष्ट्रांमध्ये चायना, लिबिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, सिरीया, उत्तर कोरिया ही राष्ट्रे आहेत. रशियाला आवडत्या आणि नावडत्या राष्ट्रात समान गुण मिळाले आहेत.

गॅलपने म्हटले आहे की, आठ देश नावडत्या विभागात मोडले गेले असून याचे कारण म्हणजे ती राष्ट्रे कोणत्या ना कोणत्या युद्धात, वादात किंवा अनेक प्रकरणात गुंतलेली आहेत. त्यामुळे अमेरिकन जनतेने त्यांना नाकारले आहे.

अमेरिका आणि पाकिस्तानचे संबंध दोन लष्करी प्रकरणांवरील भ्रष्टाचाराच्या वादात अडकले आहेत, असे सर्वेक्षणात म्हटले आहे.

Leave a Comment