दबंग सिनेमातील ‘मुन्नी बदनाम हुई’ या हिट आयटम सॉंगमुळे अभिनेत्री मलाइका अरोरा-ख़ान चांगलीच फेमस झाली आहे. त्यामुळेच तील गेल्या काही दिवसापासून परदेशातूनसुद्धा परफॉर्मेंससाठी मागणी वाढली आहे. येत्या काळात मलाइका बॉलीवुडची अभिनेत्री बिपाशा बसूसोबत इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कंसर्टमध्ये परफॉर्मेंस सादर करणार आहे. या दोघींचा शो ५ एप्रिलला बर्मिंघम येथे तर ७ अप्रैलला लंडनमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
मलाइका-बिपाशा करणार इंग्लंडमध्ये परफॉर्मेंस
मलाइकाने हा परफॉर्मेंस शो मध्ये जाळीदार गाउन घालण्याचा निर्णय घेतला आहे. मलाइका एक इवेंटच्यावेळी अशास्वरूपाचा ड्रेस घालून झळकणार आहे.यापूर्वी अभिनेत्री मलाइका अरोरा-ख़ान हिने आयटम सॉंगवर डान्स केला आहे. काही दिवसापूर्वी आलेल्या ‘दबंग-२’ मध्ये तिने ‘पांडेजी सीटी मारे’ या आयटम सॉंगवर डान्स करून तिच्या चाहत्यांना ठेका धरायला लावला होता .
लंडनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शो मध्ये अभिनेत्री मलाइका घालत असलेला जाळीदार गाउन सध्या बॉलीवूडमध्ये चर्चेचा विषय झाला आहे. या स्टाइलिश ड्रेसमधून तिच्या फिगरचे प्रदर्शन होणार आहे. हा ड्रेस घातल्यानंतर मलाइका खूपच आकर्षक दिसत असल्याने सध्या तिच्या या नवीन लूकची सगळीकडे चर्चा आहे.