भारतात प्रथमच एमपी-५ गन हस्तगत

चंदिगड: पंजाब पोलिसांनी नुकतेच बब्बर खालसा इंटरनॅशनल (बीकेआय) च्या अतिरेक्याला अटक केली तेव्हा त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुरुवारी पंजाब पोलिसांना दोन प्रगत, स्वयंचलित एमपी-५ गन सापडल्या. भारतात यापूर्वी अशाप्रकारच्या गन कधीही हस्तगत झाल्या नव्हत्या.

तरण तारण जिल्हा, वेरोवल पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दि. २६ फेब्रुवारी रोजी अटक केलेला अतिरेकी नरेन सिंह चौरा याच्याद्वारे मिळालेल्या माहितीनुसार पंजाब पोलीसांना आज दोन प्रगत अ‍ॅटॉमाटिक एमपी-५ गन आणि दोनशे काडतुसासह एक रिव्हॉल्वर सापडले.

चौरा याला जेव्हा अटक केली तेव्हा त्याच्याकडून मोठ्याप्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला. त्यामध्ये एके-५६ रायफल, एक मासिक , ३० जीवंत काडतुसे, एक पिस्तुल, ३० पोती दारुगाळा आणि पाच हातबॉम्ब यांचा समावेश होता. चौरा हा पंजाब मध्ये १९८० पासून अतिरेक्यांशी संगनमत करून होता. त्याच्यावर अनेक गुन्हे नोंदवले गेलेले आहेत. तो पंजाबमध्ये नाव बदलून अतिरेकी कारवाया करित असे.

चौरा याने चंदिगडच्या बरेल जेलमधून बब्बर खालसाचे अतिरेकी जगतारसिंग हावरा, जतारसिंग तारा आणि परमजितसिंग भौरा यांना पळून जाण्यासाठी हत्यारे पुरविली होती. त्याद्वारे त्यांनी जेलमध्ये १०८ फुटाचे भुयार खणले आणि पलायन केले. चौराला पकडण्यासाठी १० लाखाचे इनाम पंजाब पोलीसांनी जाहीर केले होते.

Leave a Comment