गुगलच्या युजर्सवर एफबीआयची नजर

ह्युस्टन: अतिरेकी कारवायांच्या पार्श्‍वभूमीवर एफबीआय अर्थात फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन जगातील नावाजलेल्या गुगलची पारदर्शकता तपासत असून त्याच्या युजर्सवर करडी नजर ठेऊन आहेत.

यामध्ये एफबीआय गुगलच्या युजर्सचे नाव, पत्ता, वापरण्यात आलेली सर्विस किंवा अन्य कोणत्याही बाबतीत माहिती मागवू शकते. यासाठी एफबीआय राष्ट्रीय सुरक्षा पत्रांचा वापर करीत आहे. त्यानुसार कोणताही संशय येताच ते गुगलकडून केव्हाही सूचना मागवू शकतात.

सन २००९ पासून आतापर्यंत गुगलला जवळपास चार हजार राष्ट्रीय सुरक्षा पत्र प्राप्त झाले असून त्यात सुमारे दहा हजार अकाऊंटची माहिती मागविण्यात आली आहे; असे गुगलने स्पष्ट केले आहे.