लहान वयात करोडपती, मुलींवर पैसे उधळून रोडपती

andrew

वॉशिंग्टन – वयाच्या एकविसाव्या वर्षी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर अँड्र्यू फॅशन या बिझनेसमनने २.५मिलियन डॉलर्स म्हणजेच १३कोटी ७५ लाख रुपये कमावले. मात्र अवघ्या २ वर्षांत तो पुन्हा निर्धन झाला आहे.

लहान वयातच करोडो रुपये कमावणं हे जेवढं कठीण असतं, त्याहून जास्त हे पैसे मिळवल्यावर हे यश आणि संपत्ती टिकवणं कठीण असतं. अमेरिकेतील अँड्र्यू फॅशनला यश तर वयाच्या २१ व्या वर्षीच मिळालं. पण त्यासोबत आलेली संपत्ती मात्र टिकवता आली नाही. कारण वयाच्या बावीसाव्या वर्षीच त्याने जुगार आणि मुलींवर आपला सगळा पैसा उधळून लावला. वयाच्या २३ व्या वर्षी अँड्र्यू एक गरीब निर्धन मनुष्य बनला आहे.

ऐन तारुण्यात मिळवलेल्या पैशामुळे अँड्र्यू फॅशनचा पाय घसरला. त्याने आपल्याला मिळालेला पैसा अय्याशीमध्ये उडवला. जुगार आणि सुंदर मुलींवर पैसे लुटत वर्षभरातच अँड्र्यू ने आपल्याकडील करोडोंची संपत्ती संपवून टाकली. आता अँड्र्यू कडे पैसेच नाहीत. ही घटना आजच्या तरुण पीढिसाठी बोधप्रद ठरु शकते. नकळत्या वयात हाती आलेला पैसा टिकवणं सोपं नाही. अँड्र्यू फॅशनलाही हे शक्य झालं नाही, आणि आता तो एक सामान्य माणूस बनला आहे.

Leave a Comment