उंचीवरून पडूनही लहानगा वाचला

fall

वॉशिंग्टन- ’देव तारी, त्याला कोण मारी’ अशी एक म्हण आहे. त्या म्हणीचाच प्रत्यय येईल, अशी एक घटना नुकतीच अमेरिकेत घडली. चार वर्षांचा एक मुलगा तिसर्याक मजल्याच्या खिडकीतून पडला… पण हवेत दोन कोलांट्या उड्या खाऊनही तो जमिनीवर पडताना चक्क स्वतःच्या पायांवर उभा राहिला…आणि तोही धडधाकटपणे! या सुदैवी मुलाचं नाव आहे डिलान हेज! ऑॅरोरा अपार्टमेंटमध्ये तिसर्यास मजल्यावर त्याचं घर आहे. त्याची आई जेसिका कार्पेट धूत होती. त्या वेळी डिलान खिडकीत बसला आणि खालच्या मजल्यावरच्या शेजाऱ्याशी बोलण्यासाठी वाकला. तेवढ्यात त्याचा तोल गेला आणि दोन वेळा हवेत कोलांट्या उड्या खात जमिनीवरच्या खडकावर उभा राहिला.

एवढा बाका प्रसंग आल्यावर अर्थातच त्याची आई घाबरली. तिने लगेच त्याला हॉस्पिटलमध्ये नेले. वीस तास तो तिथे दाखल होता. सावधगिरीचा उपाय म्हणून त्याच्या मानेवर एक पट्टाही लावण्यात आला होता. पण ’त्याला फक्त थोडेसे खरचटले आहे, बाकी काहीही झालेले नाही,’ असा निष्कर्ष काढून त्याला डॉक्टरांनी घरी सोडले.
मी खूपच घाबरले होते. खाली जाऊन मला काय पाहायला मिळतेय, या कल्पनेनेच मला घाबरायला झाले होते,’ असे जेसिका यांनी सांगितले. ’

छोट्या मुलांबाबत असे भीतिदायक प्रसंग घडू शकतात. त्यामुळे पालकांनी कायम सजग राहायला हवे, असा इशारा या घटनेतून मिळाला आहे,’ असेही त्यांनी सांगितले. यापुढे काळजी म्हणून जेसिका यांनी ते उंचावरचे घर सोडले असून, त्या पहिल्या मजल्यावरच्या घराच्या शोधात आहेत.

Leave a Comment