केवळ विचारांवर चालणार भविष्यातली अंतराळयाने

नजिकच्या भविष्यात जेव्हा अंतराळवीर चंद्रावर अथवा मंगळावर जातील तेव्हा ते प्रवास करत असलेली अंतराळयाने अंतराळवीरांच्या विचारावरच नियंत्रित होऊ शकतील असे संशोधकांचे म्हणणे आहे. रिकार्डो पोली या इसेक्स विद्यापीठातील संगणक प्राध्यापकांनी केलेल्या संशोधनात पहिल्यांदाच ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेसचा वापर स्पेस क्राफट सिम्युलेटर नियंत्रणासाठी यशस्वीपणे केला आहे.

या संशोधकांच्या मते अंतराळवीर अंतराळात जातात तेव्हा तेथे गुरूत्वाकर्षण नसलेल्या परिस्थितीत त्यांना वावरावे लागते आणि ते अतिशय त्रासदायक असते. शिवाय अंगावरचा जड स्पेस सूट, हातातले ग्लेाव्हज, जड हेल्मेटस यांच्यासह वावरताता त्यांना फारच अडचण होत असते. तेथे कोणतीही कामे करताना मुळातच कामाचा वेग कमी होतो आणि हालचाली सुलभ होत नसल्याने दमणूकही जास्त होते.

नवीन संशोधनानुसार ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेसचा वापर अधिक प्रभावी सिद्ध झाला आहे. यामुळे जे काम करायचे असेल ते अंतराळवीरांच्या पथकाने नुसते मनात आणायचे आणि त्यांनी या कामासंबंधी एकत्र विचार करायचा की ज्यामुळे यानातील संगणकाला योग्य त्या सूचना मिळून त्याप्रमाणे कामाची कार्यवाही होऊ शकेल. यासाठी ६६ इलेक्ट्रोडस बसविलेले हेल्मेट त्यांना वापरावे लागणार आहे. या सेन्सरमुळे मानवी मेंदूचे सिग्नल पकडणे आणि ते संगणकावर परावर्तित करणे शक्य होणार आहे असे संशोधकांचे म्हणणे आहे.