बीड जिल्ह्यात वर्षभरात ७३ शेतक-याच्या आत्महत्या

बीड- गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती कायम आहे. सध्या तर दुष्काळी स्थिती अधिक गंभीर आहे. बीड जिल्ह्यात पूर्वीपासून नापिकी आहे. विदर्भप्रमाणे बीड जिल्ह्यत काही दिवसांपासून शेतक-याच्या आत्महत्याचे सत्र सुरूच आहे. नापिकी आणि कर्जबाजारी झाल्याने शेतकरी आत्महत्या करत आहेत. १ एप्रिल २०१२ पासून ते आतापर्यंत म्हणजेच वर्षभरात ७३ शेतक-यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून जीवनयात्रा संपवली असल्याचे पुढे आले आहे. या आत्महत्या केलेल्या ७३ शेतक-यांपैकी आतापर्यंत ४१ शेतक-यांच्या कुटुंबियांना सरकारी मदत मिळाली आहे. त्यामुळे सरकारने या आत्महत्या रोखण्यासाठी शेतक-याना मदतीसाठी विशेष पकेज देण्याची गरज आहे.

तसा पहिला तर बीड जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. दर दोन पाच वर्षांनी बीड जिल्ह्याला दुष्काळाचा सामना करावा लागतो. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी या दुष्काळाच्या दुष्टचक्रात सापडतो. नापिकी आणि कर्जबाजारी झाल्याने शेतकरी आत्महत्या करत आहेत. १ एप्रिल २०१२ पासून आजतागायत जिल्ह्यातील ७३ शेतकऱ्यांने आत्महत्या केला आहे. यामधील ४१ शेतक-यांवर कर्जाचा बोजा होता. त्यामुळे अशी कुटुंबे सरकारी मदतीस पात्र ठरली आहेत. या आत्महत्या केलेल्या शेतक-या पैकी ४१ शेतक-यांच्या कुटुंबियांना एक लाख रुपयाची सरकारी मदत देण्यात आली आहे. तर त्यापैकी १७ शेतकऱ्यांची आत्महत्या प्रकरणे मदतीस अपात्र ठरली आहेत. या महिन्यात होणा-या बैठकित १६ प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत.

विदर्भातील जिल्ह्यानंतर बीड जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत. याठिकाणी नापिकी आणि कर्जबाजरी पणाच्या फटका बसल्याने निराशेतून गळफास किंवा विषारी औषध घेवून शेतकरी जीवनयात्रा संपवत असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे सरकारने या दुष्काळी जिल्ह्यातील शेतक-याना मदतीसाठी पकेज देण्याची गरज आहे.

Leave a Comment