मुंबई: महिलांवरील वाढत्या अत्याचाराने ‘बिग बी’ अर्थात अमिताभ बच्चन दु:खी आहेत. त्यांच्या मते महिलांना पूर्ण स्वातंत्र्याने जगण्याचा हक्क आहे आणि तो मिळायला पाहिजे. त्यांच्याविरूद्ध होणारे अत्याचार आता तरी थांबायला पाहिजेत.

अमिताभ यांनी आपला ब्लॉग ’एसआरबच्चन डॉट टंबलर डॉट कॉम’ मध्ये लिहीले आहे की, महिलांचा अपमान बंद करा. याला सन्मानासह स्वीकारा. आम्ही अस्तित्वात असण्यात महिलांचे महत्तवपूर्ण योगदान आहे. त्यांचे संरक्षण करा आणि त्यांच्याविरूद्ध उठणारे हात थांबवा.
बिग- बीने पुढे लिहिले की, ८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मी महिलांसाठी सुरक्षित वातावरण बनवण्यात आपले योगदान देईन. तुमची योजना काय आहे; असा सवालही त्यांनी वाचकांना केला आहे.
अमिताभने महिलांविरूद्ध अत्याचार रोखण्यासाठी चालवलेली आंतरराष्ट्रीय मोहीम ‘ब्रेक थ्रू’ला आपले समर्थन दिले आहे. या मोहिमेची सुरूवात सन 2008 मध्ये करण्यात आली. या अंतर्गत महिला व पुरुषांना घरगुती हिंसेविरूद्ध उभे होण्याचे आवाहन केले जाते.