गेल्या काही दिवसापासून अभिनेत्री मनीषा कोइराला ही बायॉग्रफी लिहण्यात व्यस्त आहे. गेल्या जून महिन्यात तिला ओवरीचा कॅन्सर असल्याचे माहिती झाले होते. त्यानंतर तिने त्याची ट्रीटमेंट यूएसमध्ये घेतली आहे. नुकतीच तिने एका सोशल नेटवर्किंग साइटवर माहिती दिली आहे. त्यामध्ये तिने सध्या बायॉग्रफी लिहित असल्याचे स्पष्ट केले.
मनीषा कोइराला लिहणार बायॉग्रफी
विशेष म्हणजे मनीषाने आतापर्यंत यामध्ये ती काय लिहणार आहे याचा खुलासा केलेला नाही. या कहानीमध्ये ती लाइफमधील सर्व खुलासे करणार की नाही याबाबत मात्र अजून तरी सस्पेन्स कायम आहे. ट्रीटमेंट घेत असल्याने मनीषाच्या हेल्थमध्ये सुधारणा झाली आहे. ज्यासाठी तिने यूएस मध्ये उपचार करणा-या डॉक्टर्सचे आभार मानले आहेत.
मनीषा म्हणाली, ‘गेल्या काही दिवसापासून ब्लड टेस्ट मध्ये खूपच सुधरणा झाली आहे. त्याशिवाय माझ्यासाठी काही जणानी प्रेयर केली आहे. त्यामुळे माझ्या तब्यतीत खूपच सुधारणा झाली आहे. लवकरच ती भारतात परतणार आहे. इंटरनेटच्या माध्यमातून मी फ्रेंच भाषा शिकत आहे.’