नव्या फेरारीसाठी माझ्याकडे पैसे नाहीत – रतन टाटा

ferrari

गाड्यांचे शौकिन आणि स्वतः अनेक वर्षे कार उत्पादनाचा अनुभव असलेल्या टाटा समुहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना नवीन हायब्रीड फेरारी- ला फेरारीने चांगलीच भुरळ घातली आहे. जिनिव्हा येथे सुरू असलेल्या अंतरराष्ट्रीय वाहन प्रदर्शनात टाटा यांनी ला फेरारी पाहिली तेव्हा त्यांच्यासोबत फेरारीचे चेअरमन लुका कार्डिनो डी मॉटेझेमोन हेही होते. लुका रतन टाटांचे जवळचे मित्रही आहेत.

या गाडीविषयी बोलताना रतन टाटा म्हणाले की ही गाडी खरोखरच टेरिफिक आहे. मात्र आपण ती विकत घेणार नाही. कारण ती विकत घेण्याइतके पैसे माझ्याकडे नाहीत.. ला फेरारी या गाडीची दीर्घकाळ प्रतीक्षा केली गेली असून या प्रदर्शनात ती सादर झाली आहे.

कार्बन फायबरची बॉडी असलेली ही सुपरकार ताशी ३५० किमी वेगाने धावू शकते. पॉवरफुल गॅसोलिन इंजिन इलेक्ट्रीक मोटर्ससह या गाडीला देण्यात आली आहेत असे फेरारीमधील अधिकाऱ्यानी सांगितले.