दोन सिनेमातून चांगला रोल मिळाल्याने फेमस झालेला अभिनेता रणवीर सिंह गेल्या काही दिवसापासून भलत्याच फॉर्ममध्ये आहे. सिनेमामुळे त्याच्या चाहत्यात भरच पडत आहे. अभिनेता रणवीर सिंह हा आशिकमिजाज आहे,याची कल्पना सर्वाना आली होती. मात्र त्याची आशिकी एवढी वाढली असेल याची कल्पना मात्र कुणालाच आली नव्ह्ती. गेल्या काही दिवसापासून तो अभिनेत्री दीपिका पदुकोनच्या प्रेमात पडला आहे.
याबाबत बोलताना अभिनेता रणवीर सिंह म्हणाला,’ लवकरच लग्न करून सेटल होण्याचा त्याचा विचार आहे. गेल्या काही दिवसापासून मला अभिनेत्री दीपिका पदुकोन खूप आवडत आहे. मात्र ही पसंत प्रेम आहे हे समजण्यासाठी मला आणखीन थोडा वेळ हवा आहे. त्यानंतर मी याबाबत बोलेन.’
यापूर्वी रणवीर सिंह आणि अभिनेत्री अनुष्काच्या अफेयरची चर्चा होती. मात्र गेल्या दिवसापासून रणवीरला दीपिका आवडत असल्याने त्याचीच चर्चा सर्वत्र सुरु आहे. सध्या तो ‘गुंडे’ सिनेमाच्या शुटमध्ये अभिनेत्री प्रियंका चोप्रा सोबत व्यस्त आहे. शूटसाठी कोलकात्त्याला जाताना रणवीरने एक फ्लाइटची एयर होस्टेस सोबत वाद घातला होता. त्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.