‘यूडीआरएस’ ठरणार पुन्हा वादाचा मुद्दा

मुंबई – आगामी काळात दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताच्या दौ-यावर येत आहे. यावेळी दक्षिण आफ्रिकेचा संघ तीन कसोटी सामने खेळणार होता. त्याऐवजी आता चार कसोटींच्या आयोजनाचा प्रस्ताव या बैठकीपुढे येणार आहे. त्यासोबतच बैठकीतील चर्चेचा वादग्रस्त विषय ‘यूडीआरएस’ हा असणार आहे. त्यामुळे पुढील महिन्यात कोलकाता येथे होणा-या या बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे.

पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाचे अधिकारी ‘टीम इंडिया’च्या आगामी दक्षिण आफ्रिका दौ-याच्या व्यवस्थेबाबत अंतिम बोलणी करण्यासाठी भारतात येणार आहेत. दक्षिण आफ्रिकेने यूडीआरएस सिस्टिमला कायम पाठिंबा दर्शवला आहे. भारताने मात्र ही यंत्रणा परिपूर्ण नसून पायचीतसारखे निर्णय देताना त्रुटी असल्याचे कारण सांगून कायम विरोध केला आहे.

भारताच्या या विरोधाला कायम आडवे जाणारे आयसीसीचे माजी सीईओ हरून लॉगर्ट हे दक्षिण आफ्रिकेच्या प्रमुख कार्यकारी अधिकारी या पदासाठीचे प्रबळ दावेदार आहेत. बोर्डाच्या बैठकीत लॉगर्ट यांचा समावेश असल्यामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका बोर्डात यूडीआरएस व अन्य काही मुद्द्यांवरून संघर्ष उडण्याची शक्यता दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

यूडीआरएस म्हणजे अम्पायर डिसिजन रिव्ह्यू सिस्टिम होय. या नियमानुसार मैदानी पंचांच्या निर्णयाला आव्हान देण्याची मुभा दोन्ही संघांना असते. दोन्ही संघांना ठरवून दिलेल्या संख्येनुसार रिव्ह्यू अपील करावे लागते. ‘टीम इंडिया’ने सुरुवातीपासून यूडीआरएसला विरोध केला आहे. त्यामुळे आता दोन्हीही देशादरम्यान या पद्धतीवरून संघर्ष होणार आहे.

Leave a Comment