पोप बेनेडिक्ट जाताच कोसळली प्रकरणांची मालिका

एका बाजूला पोप बेनेडिक्ट यांना भावपूर्ण निरोप देण्याच्या कार्यक्रमातून श्रद्धाळू घरी परतत होते आणि दुसर्याक बाजूला पोप बेनेडिक्ट सोळावे यांना एका कार्डिनलशी अनैतिक संबंध असल्याने जावे लागले, याच्या बातम्या शेकडो वाहिन्या आणि वृत्तपत्रांच्या इंटरनेट आवृत्यावर झळकू लागल्या होत्या. काही महिन्यापूर्वी त्यांची कागदपत्रे चोरीस गेली तेंव्हाच ‘काही तरी निराळे घडते आहे’ याची जाणीव झाली होती. गेले काही दिवस तर अशी चर्चा होती की , पोप बेनेडिक्टयांचे सचीव कार्डिनल जॉर्ज गॅन्सविन  यांनी त्यांना बंदी बनविले आहे. अतिशय सुंदर व्यक्तिमत्वाचे हे कार्डिनल गेले काही दिवस हीन पातळीवरील टीकेचे लक्ष्य झाले होते. व्हेटिकनमधील एक ज्येष्ठ अधिकारी फादर लोंबार्डी यांना पोप यांच्या भेटीसाठी आलेल्या कार्डिनल गॅन्सविन यांनी दोन तास ताटकळत ठेवले होते. तेंव्हाच त्यावर चर्चा सुरु झाली होती. त्याच प्रमाणे पोप हे हिटलरयुवा संघटनेचेही सदस्य होते. तोही मोठा टीकेचा विषय झाला होता.

खरे म्हणजे  एखाद्या व्यक्तीने वृद्धापकाळाने जर निवृत्तीची इच्छा व्यक्त केली तर ती प्रामाणिक मानली पाहिजे. पोप इमेरिटस बेनेडिक्ट हे जरी आज वादग्रस्त झाले असले तरी ते सव्वाशे कोटी जनतेचे प्रतिनिधी किवा सम्राट म्हणून गेली आठ वषे वावरत असल्याने त्यांच्याकडून त्यांच्या जनतेला व त्यांच्या विरोधकांना त्या महासत्तेबाबत म्हणायचे आहे त्याला आज निराळाच अर्थ प्राप्त झाला आहे. रशियातील दैनिक प्रवदा दैनिकांने गेली तीन वर्षे एक लेखमाला सुरु केली होती. त्याचा विषय होता की, जगात तिसर्यान महायुद्धाला आरंभ झाला आहे. त्या दैनिकांचे म्हणणे असे की, गेल्या पंचवीस वर्षात ख्रिश्चन विश्वातील तीस ते चाळीस कोटी लोकसंख्या मुस्लिमांनी पळवली आहे तर मुस्लिमविश्वातीलही तेवढीच संख्या खिश्चनांनी पळविली आहे. चीनसह प्रत्येक देशात या आघाडीवर ‘इंच इंच लढवू’ अशी स्थिती आहे. जगात अनेक ठिकाणी रस्त्यावरील एकेका दर्ग्याला बंकरचे रूप आले आहे.

बेनेडिक्ट यांचा विषय अजून महिन्याभरात इतिहास जमा होणार आहे. तोपर्यत नवा पोप येणार आहे. पंचवीस कोटींची पळवापळवी हा विषय मात्र ऐरणीवर राहणार आहे. भारतात या विषयांचा कसलाही थांगपत्ता नसला तरी जगात भारतात सर्वात अधिक वेगाने ख्रिश्चनीकरण सुरु असल्याने येथेच यावर सखोल चर्चा करणे आवश्यकच आहे.  जगभर सध्या एका बाजूला मुस्लिम संघटना जगभर प्रचंड आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी युरोप व अमेरिकेत आपली संख्या गेल्या दहा वर्षात दुप्पट करून दाखविली आहे. अमेरिकेत ९।११चा प्रसंग म्हणजे वर्ल्ड ट्रेड सेंटरचे दोन टॉवर्स पडल्यावर युरोप व अमेरिकेतील मुस्लिम बचावात्मक असतील असे वाटत होते. दिसायला ते तसे दिसतही होते पण त्यानंतर युरोप आणि अमेरिका यांच्या ज्या दशवार्षिक जनगणना जाहीर झाल्या आहेत त्यात त्यांची संख्या दुप्पट झाल्याचे स्पष्ट झाल्याने सारे त्या खंडातील सारे देश हादरले आहेत.

या वाढीने व्हेटिकन संघटना, प्रोटेस्टंट संघटना व अन्य ख्रिश्चन संघटना हादरल्या आहेत पण केवळ मुस्लिम वाढले हे त्यांचे एकमेव कारण नाही. युरोप अमेरिकेतील ख्रिश्चन कमी होत आहेत. उपलब्ध ही संख्या पंधरा कोटींनी कमी झाली आहे. अर्थात ही संख्या कमी होत आहे म्हणून ती मंडळी हातावर हात ठेवून बसणारी नाहीत. गेल्या चाळीस वर्षात आशिया आणि आफ्रिका या खंडात कॅथलिकांची संख्या पंधरा कोटींनी वाढली आहे. प्रोटेस्टंटांचीही अशीच स्थिती आहे. चीनही अशा लोकसंख्यायुद्धाबाबत फारच सावध आहे. भारत हा जगातील असा देश आहे की, येथील राजकारण्यांना त्यांच्या देशातील अशा घटनांची जाणीव तर नसतेच पण या देशाला पराभूत करायला बसलेल्यांच्या मदतीने ते सत्तेवर येत असतात. असे उदाहरण जगातील अन्यत्र कोठे नसेल.

जगातील हे लोकसंख्यचे युद्ध किवा दैनिक प्रवदाने म्हटल्याप्रमाणे महायुद्ध हे अशा पद्धतीने सुरु आहे की कोणत्याही स्थितीत त्याला अध्यात्मिक म्हणणे शक्य नाही. धर्मांतर आणि नरसंहार हे शब्द आफ्रिकेत त्याच्या गेल्या पाचशे वर्षाप्रमाणेच एकमेकाला पर्याय झाले आहेत. पण नैतिक अधःपतन ही निराळीच एक समस्या सध्या ऐरणीवर आली आहे. ती इतकी गंभीर आहे की, ती आज युरोप व अमेरिकेत आहे आणि हळूहळू ती सार्याल जगाला गिळंकृत करायला निघाली आहे. पोप यांच्या प्रमाणेच अनेक बिशप , आर्च बिशप आणि कार्डिनल यांच्यावर त्या स्वरुपाचे आरोप आहेत.

नैतिक अधःपतनाचे प्रकार पूर्वीही होत असत पण त्याचे प्रमाण कमी होते आणि ते फारच वाढले आहे. याकडे सवंगतेने बघितले तर तोही एक अपराधच ठरणार आहे. या दोन्ही महाशक्तींचे धर्मांतराचे व नरसंहाराचे प्रकार जेवढे गंभीर आहेत तेवढेच अधःपतनाचे प्रकार गंभीर आहेत येवढे त्याचे व्यापक स्वरुप आहे. प्रामुख्याने एका चर्चसंघटनेनेच संगणकावर सुरु केलेला अयोग्य दृष्यांचा प्रकार हे आज जगाच्या अधःपतनाचे कारण होवू घातले आहे.

पोप बेनेडिक्ट यांची निवृत्ती हे जरी या विषयाकडे बघण्याचे नैमित्तिक कारण असले तरी पुढील काळात या तीनही समस्या भारताच्या दृष्टीने गंभीर होणार आहेत. एक म्हणजे परम सहिष्णु नसलेल्यांच्या आक्रमक वृत्तीचा सर्व शक्तीनिशी सामना करावा लागेल. सर्वधर्मपरिषदातून मध्य आशियातील हे धर्म जरी परस्परांच्या सौहार्दाची भाषा करत असले तरी ‘जर आम्ही ज्याला परमेश्वराचा दूत मानतो त्याला जर तुम्ही मानत नसाल तर तुम्हाला जिवंत राहण्याचा अधिकारच नाही असे तत्वज्ञान घेऊन ही मंडळी गेली काही शतके वागत आहेत आणि आजही जगभर ती आक्रमक आहेत. भारतातही त्यांची आक्रमकच भूमिका आहे. गेली एक हजार वर्षे त्यांच्यामुळेच येथे पारंतंत्र्य आहे. आज परत ते येथे सर्वशक्तीनिशी उभे रहात आहेत. गेल्या महिन्यात स्वामी विवेकानंद यांची दीडशेवी जयंती देशाने उत्साहाने साजरी केली, त्यांच्या शिकवणीत कदाचित या तीनही मुद्दयावर मार्गदर्शन मिळण्याची शक्यता आहे. भारताच्या दृष्टीने भाग्याची बाब म्हणजे भारताला अशा ऋषीमुनींची आणि योद्धासंन्यासींची मोठी परंपरा आहे. त्यापद्धतीने त्यावर विचार करावा लागेल येवढेच आज म्हणता येईल.

Leave a Comment