पाक राजकीय पक्षांचाच दहशतवाद्यांना आश्रय: इम्रान

लाहोर: पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि नवाज शरीफ यांच्या पक्षानेच बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनांच्या दहशतवाद्यांना आपल्याकडे आश्रय दिला असल्याचा गंभीर आरोप तहरीक ए इन्साफ या पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी केला आहे.

आगामी निवडणुकीसाठी हे पक्ष लष्कर ए जांघवी सारख्या दहशतवादी संघटनांशी हातमिळवणी करीत असल्याचा आरोपही त्यांनी केलो आहे. पाकिस्तानात सुरू असलेल्या शिया आणि सुन्नी संघर्षालाही सरकारच जबाबदार असल्याचा त्यांचा आरोप आहे. ते येथे पत्रकारांशी बोलत होते.

पाकिस्तानातील प्रमुख राजकीय पक्षांनी दहशतवादी संघटना आणि गटांना दिलेल्या पाठिंब्यामुळे आणि मदतीमुळे आता येथील दहशतवादाची परिभाषाच बदलली आहे. पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री शहाबाज शरीफ यांनी लष्कर ए जांघवी या संघटनेच्या दहशतवाद्यांना आपल्या निवासस्थानी आश्रय दिल्याचा आरोप अंतर्गत व्यवहार मंत्री रहमान मलिक यांनी अलिकडेच केला आहे. याचा संदर्भही इम्रान खान यांनी यावेळी दिला.

Leave a Comment