उत्तर अमेरिकेत हिमवादळ; जनजीवन विस्कळीत

शिकागो: उत्तर अमेरिकेत मोठ्याप्रमाणात घोंगावणार्‍या हिम वादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे मंगळवारी विमानांची २६० उड्डाणे रद्द करण्यात आली तर शंभरहून अधिक शाळा बंद आहेत. रस्ते आणि महामार्ग ठप्प झाले आहेत.

या हिमवादळातील बर्फ आणि धुक्यामुळे चार जणांचा अपघाती मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तसेच अनेक भागात झाडे उन्मळून पडली आहेत तर रस्त्यावर सुमोर दोन फूट (६० सेंटिमीटर) बर्फ साचला असून त्यावरुन प्रवास करणे अशक्य झाले आहे. रस्ता मोकळा करण्यासाठी बर्फ हटविण्याचे काम सुरु असले तरी मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्याने त्या कामात अडथळे येत आहेत. लोकांना गरज असल्यासच रस्त्यावरुन प्रवास करावा असे हवामान खात्याने सूचित केले आहे.

या बर्फवृष्टीमुळे शिकागोच्या ओ हेअर विमानतळावर ९०० विमाने अडकून पडली आहेत तर २६० विमाने मंगळवारी रद्द करण्यात आली आहेत. तसेच वॉशिंगटन भागातील बुधवारचे विमानाचे वेळापत्रकही रद्द करण्यात आले आहे. हे वादळ राष्ट्राच्या राजधानीवर बुधवारी धडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मतदानाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने भरविलेली अर्थसंकल्पावरील चर्चा रद्द करण्यात आलेली नाही. मध्य अटलांटिक राज्यात या वादळाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्रज्ञ डॅन पिटासेन यांनी वर्तवला आहे.

Leave a Comment