वॉलमार्ट लॉबिंगच्या चौकशीसाठी समिती स्थापन

नवी दिल्ली: रिटेल क्षेत्रातील बलाढ्य कंपनी वॉलमार्टच्या बहुचर्चित लॉबिंगची चौकशी करण्यासाठी न्या. मुकुल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापण्याची घोषणा केंद्र सरकारने केली.

दि.३१ जानेवारी २०१३ रोजी कंपनी व्यवहार मंत्रालयाने वॉलमार्टच्या लॉबिंगची चौकशी करण्यासाठी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मुकुल मुदगल यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापण्याचा ठराव केला; अशी माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री नमोनारायण मीना यांनी आज लिखित उत्तराद्वारे राज्यसभेला दिली.

ही समिती वॉलमार्टने भारतीय कायद्याचे उल्लंघन करून लॉबिंग केले का, याची चौकशी करेल. ठराव जारी केल्यापासून तीन महिन्याच्या आत समितीला आपला अहवाल सादर करावा लागेल.

Leave a Comment