नवी दिल्ली- गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना जर्मनीने मोठा दिलासा दिला आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेसचे नेते व केंद्रीय मंत्री शशि थरुर यांनी मोदींचे समर्थन केले आहे. मात्र, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मात्र मोदींवर टीका केली आहे.

काही दिवसापूर्वी व्हार्टन स्कूलने मोदींचे भाषण रद्द केले होते. त्यानंतर आता विविध स्तरांमधून मोदींना समर्थन मिळत आहे. केंद्रीय मंत्री शशी थरुर हे मोदीच्या मागे ठामपणे उभे राहीले आहेत. भाषण रद्द करण्यापूर्वी मोदींचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे होते, असे थरुर म्हणाले; तर मोदी यांना पाठींबा दर्शवित जर्मनीने मोठा दिलासा दिला आहे.
भाजपच्या राष्ट्रीय परिषदेमध्ये मोदींनी प्रणव मुखर्जी यांची स्तुती केली होती. त्यावर मुखर्जी यांनी मोदींचे नाव न घेता; स्वतःचे विश्लेषण त्यांनी त्यांच्या जवळच ठेवावे, असा सल्ला दिला. आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांनीही मोदींना पाठींबा दिला आहे.