सौदीत सात जणांना शिरच्छेदाची शिक्षा

सशस्त्र दरोडा घातल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या सात जणांना आज म्हणजे मंगळवारी सौदीत सार्वजनिक रित्या शिरच्छेदाची शिक्षा दिली जात आहे. विशेष म्हणजे हा गुन्हा जेव्हा घडला तेव्हा हे सातही जण अल्पवयीन होते असे ब्रिटीश बेस्ड राईटस ग्रुप ऑफ अॅमनेस्टीने म्हटले आहे. अॅम्नेस्टीकडून मिळालेल्या माहितीनुसार २००६ साली या सात जणांनी सशस्त्र दरोडा घातला होता. त्यावर त्यांना २००९ साली शिक्षा सुनावण्यात आली. मात्र हे सातही जण त्यावेळी १८ वर्षांखालचे होते आणि त्यांना मारहाण करून, छळ करून, उपाशी ठेवून त्यांच्याकडून गुन्हा केल्याचा कबुलीजबाब जबरदस्तीने घेण्यात आला होता.

राजे अब्दुल्ला यांनी या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले असून सौदीच्या इंटेरियल मिनिस्ट्रीतील प्रवक्त्याने सौदीत कधीच गुन्हेगाराचा छळ करून कबुलीजबाब घेतला जात नाही असे स्पष्ट केले आहे. सौदीत शरिया अथवा इस्लाम कायद्याचे काटेखेार पालन केले जाते. त्यासंबंधाने पाश्चात्य देश नेहमीच सौदीवर टीका करतात. सार्वजनिक ठिकाणी शिरच्छेद देण्याची शिक्षा रानटी असल्याचे पाश्चात्य देशांनी वारंवार नमूद केले आहे. मात्र आक्टोबर ११ मध्येही अशाच प्रकारे सशस्त्र दरोडा टाकून सुरक्षा रक्षकाच्या मृत्यूस कारणीभूत झालेल्या ८ बांग्लादेशींना अशीच शिरच्छेदाची शिक्षा दिली गेली होती.

Leave a Comment