सैफ, रितेश करणार कॉमेडी सिनेमा

आगामी काळात अभिनेता सैफ अली खान आणि रितेश देशमुख एकत्रीत काम करणार आहेत. दोघेपण पहिल्यांदाच एकत्रित काम करीत आहेत. सिने निर्माता वाशु भगनानी करीत असलेला हा कॉमेडी सिनेमा असणार आहे.

याबाबत बोलताना सिने निर्माता वाशु भगनानी म्हणाला, ‘ आगमी काळात येत असलेल्या कॉमेडी सिनेमासाठी सैफ अली खान, रितेश देशमुख आणि अभिनेत्री जैकलीन फर्नांडीज यांची निवड केली आहे. या सिनेमासाठी चांगले कलाकार भेटले आहेत. या सिनेमाच्या कामाला आमची टीम लागली आहे. त्यामुळे सर्वांची उत्सुकता वाढली आहे.’

या सिनेमाचे दिग्दर्शन साजिद खान करणार आहे. ‘हिम्मतवाला’ या सिनेमानंतर साजिद भगनानी पहिल्यांदा सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. या सिनेमाची शुटींग यावर्षीच सुरु होणार असल्याची माहिती भगनानी यांनी दिली. पुढील वर्षी शूट पूर्ण झाल्यानंतर हा सिनेमा सिनेगृहात रिलीज होणार आहे.

Leave a Comment