
नवी दिल्ली दि. ५- सार्वजनिक क्षेत्रातील सर्वाधिक नफा कमावणारी कंपनी बनण्याचा बहुमान ओएनजीसी कंपनीने मिळविला असून सर्वाधिक तोट्यातील कंपनी बीएसएनएल ठरली आहे. सरकारने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब स्पष्ट झाली आहे.
नवी दिल्ली दि. ५- सार्वजनिक क्षेत्रातील सर्वाधिक नफा कमावणारी कंपनी बनण्याचा बहुमान ओएनजीसी कंपनीने मिळविला असून सर्वाधिक तोट्यातील कंपनी बीएसएनएल ठरली आहे. सरकारने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब स्पष्ट झाली आहे.
२०११-१२ साली केल्या गेलेल्या या सर्वेक्षणानुसार देशातील सर्वात मोठी तेल आणि वायू उत्पादक कंपनी असलेल्या ओएनजीसीने २५१२२ कोटींचा नफा कमावला आहे. दुसऱ्या क्रमांकावर गतवर्षीचीच उर्जा क्षेत्रातील एनटीपीसी कंपनी आहे. जगातील सर्वात मोठ्या कोळसा उत्पादक कोल इंडियाने यंदा गतवर्षीच्या सातव्या स्थानावरून तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे तर गतवर्षी तिसऱ्या क्रमांकावर असलेली इंडियन ऑईल यंदा सातव्या क्रमांकावर फेकली गेली आहे. लोहखनिज उत्पादक एनएमडीसी चौथ्या क्रमांकावर आहे.
महारत्न कंपनी भेल पाचव्या, साऊथ इस्टर्न कोलफिल्ड सहाव्या स्थानावर असून या कंपनीने यंदा प्रथमच पहिल्या दहात येण्याचा मान मिळविला आहे. महानदी कोलफिल्ड, गेल आणि स्टील अॅथॉरिटी ऑफ इंडिया अनुक्रमे आठ, नऊ व दहा स्थानावर आहेत.
बीएसएनएल या दूरसंचार क्षेत्रातील कंपनीने सर्वाधिक नुकसानीतील कंपनी म्हणून नोंद केली असून त्यांचा तोटा ८८५० कोटी रूपये इतका आहे. गेल्यावर्षी एअर इंडिया सर्वाधिक नुकसानीतील कंपनी होती यंदा ती दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर एमटीएनएल, हिंदुस्थान फोटो फिल्म मॅन्यूफॅक्चरर, हिदुस्थान केबल्स, एअर इंडिया चार्टर लिमि., फर्टिलयझर कार्पोरेशन ऑफ इंडिया या कंपन्यांचा नंबर आहे.