अॅपल आयफोन विविध रंगात येणार?

नोकियाच्या ल्युमिया ९२० स्मार्टफोनच्या पावलावर पाऊल टाकून अॅपलनेही आपले आयफोन विविध रंगात बाजारात आणण्याचे ठरविले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.  सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अॅपलने नुकतीच अॅनोडायझिग इंजिनिअर पदासाठी आवेदने मागविली आहेत. याचा सरळ अर्थ असा की कंपनीला अॅल्युमिनियमवर विविध रंग चढवू शकेल अशी व्यक्ती हवी आहे.

अॅपल आयपॉड विभागातूनच कदाचित अशी व्यक्ती निवडली जाईल असेही सांगितले जात आहे कारण आयपॉड अगोदरच अनेक रंगात बाजारात उपलब्ध आहेत. नेक्स्ट जनरेशन नवा आयफोन कंपनी ऑगस्ट किवा सप्टेंबर मध्ये बाजारात आणेल असा जाणकारांचा अंदाज आहे. हे आयफोन स्वस्त श्रेणीतील असतील आणि प्रामुख्याने बहरत्या बाजारपेठांना लक्ष्य करूनच ते बाजारात येतील असेही जाणकारांचे म्हणणे आहे.

Leave a Comment