राणी एलिझाबेथ रूग्णालयात दाखल

लंडन दि. ४- लंडनची राणी एलिझाबेथ दुसरी यांना पोटाचा त्रास होऊ लागल्याने रूग्णालयात दाखल केले असल्याचे बकींगहॅम पॅलेसकडून सांगण्यात आले आहे. रॉयल फॅमिलीसाठी असलेल्या मध्य लंडनमधील किग एडवर्ड सेव्हन या रूग्णालयात राणीला ठेवले गेले असून तेथे त्यांच्या अन्य तपासण्याही केल्या जात आहेत.

८६ वर्षीय राणीला शुक्रवारपासूनच पोटात दुखणे, उलट्यांचा त्रास होऊ लागला होता. राणी विडसर कॅसल मध्ये विश्रांती घेत होती मात्र बरे न वाटल्याने अखेर रविवारी तिला रूग्णालयात दाखल केले गेले असून या आठवड्यातील राणीचे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले गेले आहेत असे बकींगहॅम पॅलेसकडून सांगण्यात आले आहे. राणीचा पुढच्या महिन्यात ८७ वा वाढदिवस आहे. किमान दोन दिवस तरी राणीला रूग्णालयात राहावे लागणार आहे.

या बुधवारी राणी इटलीच्या अध्यक्षांच्या निमंत्रणावरून दोन दिवसांच्या भेटीसाठी इटली येथे जाणार होती. मात्र ही भेटही आता पुढे ढकलली गेली आहे. राणीवर उपचार सुरू असलेले किग एडवर्ड रूग्णालय गेले काही दिवस चर्चेत आहे. डचेस केट ला येथे कांही दिवसांपूर्वी मॉर्निंग सिकनेस साठी दाखल केले गेले होते तेव्हा डचेसला आलेल्या  खोट्या कॉलवरून भारतीय मूळ असलेल्या नर्सने आत्महत्त्या केली होती.

Leave a Comment