कधीच रस्त्यावर न आलेल्या कन्सेप्ट कार

कल्पक डिझायनरने ड्रीम कार म्हणून डिझाईन केलेल्या कार दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेल्या वाहन शो मधून सादर केल्या जात असतात. विविध वैशिष्ठ्ये असलेल्या या कार ग्राहकांना प्रतीक्षा करण्यास भाग पाडण्यात यशस्वीही होतात. मात्र अगदी नामवंत कंपन्यांनाही अशा सादर केलेल्या कार प्रत्यक्षात कधीच उत्पादनात आणलेल्या नसल्याचे अनुभवास येते. येथे अशाच काही कन्सेप्ट कारविषयी थोडे-

ऑडी क्वट्रो ने आपली कन्सेप्ट कार २०१० च्या पॅरिस येथे भरलेल्या वाहन प्रदर्शनात सादर केली होती. मूळ ऑडी क्वाट्रोच्या तिसाव्या वर्धापनदिनाचे निमित्त साधून ही कार प्रदर्शनात सादर केली गेली आणि कंपनी अशा लिमिटेड एडिशन कार काढणार असल्याचेही जाहीर करण्यात आले. प्रत्यक्षात हा प्रकल्प नंतर बासनात गुंडाळला गेला.

कॅडिलॅक सिक्स्टीन- स्टायलिश आणि हाय परफॉर्मन्सची ही कन्सेप्ट कार २००३ ला प्रथम वाहन प्रदर्शनात सादर केली गेली होती. इलेक्ट्रोनिक्स कंट्रोल, ऑटो ट्रान्समिशन अशी तिची कांही खासियत होती. मात्र ही कारही प्रत्यक्षात कधीच रस्त्यावर आली नाही. हीच कथा २००४ साली सादर केलेल्या क्रायस्लर एमई ४-१२ची. कंपनीने अशा दोन गाड्या सादर केल्या. हलके अॅल्युमिनियमचे इंजिन असलेली ही गाडी ताशी २१९ मैल वेगाने धावेल असा डिझायनरचा दावा होता.

फोर्ड जीआर-१ ने सादर केलेली फोर्ड शेल्बी जीआर १ ही कन्सेप्ट कार २२ लाख डॉलर्स किमतीची होती. २००५च्या नॉर्थ अमेरिकेत भरलेल्या वाहन प्रदर्शनात ती सादर केली गेली पण प्रत्यक्षात मात्र ती कधीच धावली नाही. इन्फिनिटी इमेग्रई ही निस्सान मोटर्सच्या इन्फिनिटी डिव्हीजनने बनविलेली कन्सेप्ट कार २०१२ च्या जिनिव्हा ऑटो शो मध्ये सादर केली गेली. दोन इलेक्ट्रिक मोटर्स असलेली ही कारही प्रत्यक्षात कधीच आली नाही. जग्वार सीएक्स ७५ ही अशीच आणखी एक कार. हायब्रीड इलेक्ट*ीक इंजिन असलेली ही दोन सीटर कार २०१० च्या पॅरिस ऑटो शो मध्ये सादर झाली. डिझेल फेड मायक्रो गॅस टर्बाईनवर या गाडीच्या बॅटर्याो चार्ज करता येतात. भविष्यातील डिझाईन आणि तंत्रज्ञानातील आदर्श अशी तिची वाखाणणी जाणकारांनी केली मात्र ती प्रत्यक्षात रस्त्यावर आली नाही.

२००२ साली सादर झालेली लिंकन कॉन्टीनेन्टल व २०१२ साली सादर झालेली माझदा फुराई ही या यादीतली आणखी दोन नांवे. डॉज टॉमहॉक कंपनीने ६८० किमी वेगाने धावणारी फ्यूराई ही कन्सेप्ट कार २००३ च्या प्रदर्शनात सादर केली. क्रायस्लरचा डिझायनर कार्क वॉल्टर यानेच ही कार डिझाईन केली होती मात्र प्रत्यक्ष चाचणीत ती ताशी १६० किमी वेगानेच जाऊ शकली. अर्थातच तिचे उत्पादन केले गेले नाही.

व्होक्सवॅगनची मायक्रोबस हे या यादीतले शेवटचे नांव. २००१ च्या नॉर्थ अमेरिकन वाहन प्रदर्शनात ती सादर झाली. २००२-२००५  या काळात तिच्यात अधिक संशोधन केले गेले आणि हॅनोव्हर येथील प्रकल्पात त्याचे उत्पादन सूरू होत असल्याची घोषणाही करण्यात आली. प्रत्यक्षात उत्पादन सुरू करण्यापूर्वीच हा प्रकल्प रद्द केला गेला.

Leave a Comment