आगामी काळात येत असलेल्या सिनेमात अभिनेता आमिर खान पहिल्यांदा त्याची पत्नी किरण राव सोबत मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. दिग्दर्शक असलेली किरण राव पहिल्यांदाच कैमरेच्या समोर दिसणार आहे. आमिर आणि किरण पहिल्यांदाच दिग्दर्शक राजकुमार हिरानीच्या ‘पीके’ या सिनेमातून दिसणार आहेत. या सिनेमात किरण राव पाहुण्या कलाकाराचा रोल करणार आहे.
यापूर्वी कैमरेच्या पाठी मागील आघाडी समर्थपणे पेलणारी किरण राव आता तिच्या पति आमिर खानसोबत दिसणार आहे. गेल्या काही दिवसापासून आमिर त्याच्या ‘पीके’ या सिनेमाच्या शुटसाठी परिवारासोबतच राजस्थान मध्ये आहे. सूत्रोंने दिलेल्या माहितीनुसार, सिनेमाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी किरणने या सिनेमात छोटसी भूमिका करावी म्हणून आग्रह धरला होता.
किरन ही या सिनेमाच्या सेटवर नेहमीच उपस्थित राहते. काहीवेळा तिने या सिनेमासाठी रचनात्मक माहितीसुद्धा दिली आहे. तिची सिनेमाबाबतची सक्रियता पाहून सिनेदिग्दर्शक राजकुमार हिरानीने तिला या सिनेमात काम करण्याची ऑफर दिली आहे. या ऑफरचा किरणने देखील स्वीकार केला आहे. आमिरची पहिली पत्नी रीनाने सुद्धा ‘कयामत से कयामत तक’ या सिनेमातील ‘पापा कहते हैं’ या गाण्यात अतिथि भूमिका केली होती.