अजय करणार पाच नायिकेसोबत आयटम सॉंग

बॉलीवुडचा सिंघम अजय देवगन हिम्मतवाला मध्ये पाच नायिकेसोबत झळकणार आहे. या पाच नायिकेसोबत अजय आगामी काळात आयटम सॉंग करताना दिसणार आहे. अजय पहिल्यांदाच सिनेमात पाच नायिकेसोबत आयटम सॉंग करणार असल्याने याची उत्सुकता सर्वाना लागली आहे.

या सिनेमाचा डायरेक्टर साजिद खानने सिनेमाची चर्चा करताना म्हणाला, ‘ आगामी काळात येत असलेल्या या सिनेमात अजयवर एक आयटम सॉंग ‘धोखा धोखा’ शुट केले जाणार आहे. ज्यामध्ये भोजपुरी, बंगाली, गुजराती, मराठी आणी पंजाबी सिनेमाच्या प्रसिद्ध अभिनेत्रियांची निवड केली आहे. त्यांच्या सोबत तो डान्स करताना दिसणार आहे.’

या आयटम सॉंगला बप्पी लाहिरी, सुनिधि चौहान आणि ममता शर्माने आवाज दिला आहे. या आयटम सॉंगमध्ये अजय भोजपुरी सिनेमाची अभिनेत्री रिंकू घोष, बांग्ला अभिनेत्री शयंती घोष, गुजराती अभिनेत्री मोना थीबा, मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर आणि पंजाबी अभिनेत्री सुरबीन चावला सोबत ठुमके लावणार आहे. या गाण्याची कोरियोग्राफ गणेश आचार्यने केली आहे.

Leave a Comment