द अटॅक्स ऑफ 26/11

मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी जे घडले, ते खूपच भयावह होते. इतके की असे काही घडू शकेल याची कल्पनाही कुणी केली नसेल. मुंबईत हल्ला करणारे दहा तरुण होते. हल्ल्याच्या दरम्यान अडीच दिवस मुंबई शहर वेठीला धरले होते. देशाच्या सुरक्षा यंत्रणेला काय घडलंय याचा अंदाज नव्हता; तर देशालाही काहीच समजत नव्हते.

एवढे दिवस एखादा दिग्दर्शकही या नाटकीय घटनाक्रमाला कथेच्या स्वरुपात सादर करु न शकल्यामुळे आपल्यालाही आश्चर्य वाटले नाही. खरे सांगायचे तर दिग्दर्शकाला याची सुरुवात कुठून करावी, हेच उमजत नव्हते. मात्र सिनेमा कुठे संपवायला हवा हे ठाऊक होते. दहा हल्लेखोरांपैकी एकाला जिवंत पकडले जाते आणि भारतीय न्यायव्यवस्थेनुसार त्याला अखेर फासावर लटकवले जाते. हे त्याच्यासाठी पूरक होते.

या सिनेमात आपल्याला २६/११ च्या हल्ल्यातील चार प्रमुख ठिकाणे दाखवली आहेत. कुलाब्याचे ताज हॉटेल, त्याच्याजवळच असलेले कॅफे लिओपोल्ड, सीएसटी स्टेशन आणि कामा हॉस्पिटल. वास्तविक पाहता या सिनेमात त्या रात्री घडलेल्या भयावह घटनेला तीन तासांत एकत्रित करण्यात आले आहे. हा घटनाक्रम आपल्याला माहित आहे. त्यामुळे या सिनेमाला एखाद्या टीव्ही डॉक्यूमेंट्री किंवा न्यूज शोच्या रुपात बनविले गेले असते, तर उत्तम असते.

सिनेमाच्या पहिल्या भागात विविध दृश्यांना एकत्रित करण्यात आले आहे. यामध्ये आपल्या लक्षात येते की, कुणीही व्यक्ती, मग ते पाकिस्तानातील प्रशिक्षित दहशतवादी असो, किंवा एखाद्या शहरात रक्तपात घडवून आणणारे असो, त्यांच्यापुढे आपण हतबल आहोत.

सिनेमात २६/११ च्या रात्रीची कहाणी मुंबईच्या एसीपीच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे. ही भूमिका नाना पाटेकर यांनी साकारली आहे. नानाला अभिनय करायला आवडतो. नानांना कोणतीही भूमिका द्या; ते त्या भूमिकेला योग्य न्याय देतात. म्हणूनच त्यांच्या चाहत्यांना त्यांचा अभिनय आवडतो. या सिनेमात ते ज्युरी समोर बसून विस्ताराने ती घटना सांगतात, जी त्यांनी प्रत्यक्ष डोळ्याने बघितलेली नाही. उदाहरणार्थ हे दहशतवादी ताज हॉटेलसमोर नावेतून उतरतात. वैगेरे…

26/11 च्या तथ्यांना बाजूला सारले आणि फक्त सिनेमाविषयी बोलायचे झाल्यास सिनेमात एसीपीची नेमकी भूमिका कुठली हे समजणे कठीण जाते. ते स्वतः घटनास्थळावर हजर नव्हते, शिवाय या घटनेसंबंधीचे महत्त्वाचे निर्णयसुद्धा त्यांनी घेतले नव्हते. ते आपल्या ऑफिसमध्ये बसून अजमल कसाबची विचारपूससुद्धा खूपच लापरवाहीने करतात आणि त्याची वायफळ बडबडसुद्धा चुपचाप ऐकून घेतात. खरे पाहता सिनेमात एसीपीची व्यक्तीरेखा आपल्याला कसाबचा खरा चेहरा दाखवण्यासाठी ठेवण्यात आली आहे. निश्चितच नाना पाटेकर यांचे संवाद खूप चांगले आहेत.

जर एखादा दुसरा दिग्दर्शक असता तर त्याने कसाबच्या प्रमुखालासुद्धा सिनेमात दाखवले असते. एखाद्या वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ दिग्दर्शकाने याचा सखोल अभ्यास करुन दहशतवादी हल्ल्यातील पीडित व्यक्तीची कहाणी सांगितली असती किंवा त्याने २६/११ च्या षडयंत्रामागची सूत्रे उघड केली असती. कारण आपल्याला या हल्ल्यातील प्रत्येक घटना अगदी व्यवस्थित ठाऊक आहे.

हा संपूर्ण राम गोपाल वर्मांचा सिनेमा आहे. गेल्या काही वर्षांत त्यांनी ज्या प्रकारचे सिनेमे बनवले आहेत, त्या तुलनेत हा सिनेमा निश्चितच चांगला म्हणता येईल.

चित्रपट – द अटॅक्स ऑफ २६/११, कलाकार – नाना पाटेकर, संजीव जायसवाल, निर्माता, दिग्दर्शक – राम गोपाल वर्मा

Leave a Comment