वयात आलेल्या कन्यांमुळे ओबामा चिंतित

घरातील पोर वयात आली की छातीत धस्स होत नाही असा बाप दुनियेत नसेल. मग भले तो अमेरिकेचा प्रेसिडेंट का असेना?  होय! हे अगदी सत्य आहे. खुद्द अमेरिकन फर्स्ट लेडीनेच ही कबुली दिलीय. फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांनी एका मुलाखतीत बोलताना अमेरिकेचे प्रेसिडेंट बराक ओबामा यांचे केस कामाच्या ताणामुळे नाही तर घरात वयात आलेल्या त्यांच्या दोन मुलींमुळे पांढरे होऊ लागले असल्याचे सांगितले आहे.

दुसर्यां दा अमेरिकेच्या अध्यक्षपदावर विराजमान झाल्यानंतर ओबामा यांचे केस कांहीसे पांढरे होताना दिसत आहेत. अर्थात अध्यक्षांनी आपले पांढरे होत असलेले केस लपविण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाही. तर अभिमानाने त्यांनी हे वास्तव स्वीकारले आहे. या विषयीच मिशेल यांना ओबामांवर कामाचा ताण फार पडतो काय असा प्रश्न विचारला गेला होता. त्यावर बोलताना मिशेल म्हणाल्या की आमच्या मुली मलिया आणि साशा आता अनुक्रमे १४ आणि ११ वर्षांच्या आहेत. मलिया टीन्स वयोगटात गेली आहे आणि साशाही लवकरच टीन्समध्ये जाईल.

मलिया सायंकाळी तयार होऊन पार्टीसाठी जाणार असेल आणि ती बराक ओबामांच्या जवळून गेली की त्यांचा चेहरा नकळत कांहीसा पडतो. ही किती मोठी झाली ही काळजी डोळ्यात उमटते. ओबामांवर कामाचा ताण आहेच पण त्यापेक्षा मुलींची चिता त्यांना अधिक व्याकुळ करते आणि त्या चिंतेने त्यांचे केस लवकर पांढरे होऊ लागले आहेत असे मिशेल गमतीने म्हणाल्या.

Leave a Comment