बांगला देशात अल्पसंख्यकांवर देशभर हल्ले, ३५ ठार

ढाका: गुरुवार आणि शुक्रवार हे दिवस बांगला देशमध्ये हिंदूंच्यावर हल्ले करण्यात गेले आहेत. गेल्या पासष्ट वर्षात बांगला देशात हिंदूवर जे हल्ले झाले त्यातील एक मोठा हल्ला म्हणावा लागेल. त्यात बळी पडलेल्यांची संख्या ४७ वर गेली आहे. वास्तविक हिंदूंच्या विरोधात कोणताही आंदोलनाचा मुद्दा नव्हता आणि जनताही हिंदूविरोधात नव्हती तरीही हिंदू हे जाळपोळ करणारांचे लक्ष्य झाले आहेत.

हे हल्ले झाले त्याचे कारण बेचाळीस वर्षापूर्वी ज्या पाकिस्तानी दहशतवाद्यानी आणि सैनिकांनी पंचवीस लाख लोकांचा नरसंहार व काही लाख महिलांच्यावर अनन्वित अत्त्याचार केले त्याच्या विरोधात चाळीस वर्षे रखडलेल्या आंतरराष्ट्रीय न्यायालय प्रक्रियेतील निकाल देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. हे युद्ध खटले त्वरीत निकाली निघावेत म्हणून तेथे आंदोलन सुरु होते त्यामुळे ही निकालप्रक्रिया सुरु झाली आहे.

पाकिस्तानी आणि अतिरेकी अत्याचाराविरोधात आजही बांग्लादेशमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. त्यामुळे त्या देशातील तरुण, महिला, वकील, डॉक्टर्स यांच्या संघटना त्या प्रचंड नरसंहाराचा निषेध करण्यासाठी उतरल्या आहेत तर जमाते इस्लामी ही संघटना ज्यांच्यावर नरसंहाराचे आरोप आहेत अशांच्या संरक्षणाच्या बाजूने उतरली आहे. गुरुवारी जमातेचे एक नेते दिलवर हुसेन सय्यदी याला त्या नरसंहाराचा आरोपी ठरवून न्यायालयाने फाशीची शिक्षा जाहीर केली आणि त्याची प्रतिक्रिया तेथील हिंदूवर अत्याचार करण्यात उमटली आहे.

जमाते इस्लामीचा दहशतवाद येथे चालणार नाही, अशी घोषणा तेथील जनतेतून पुढे येत आहे. तरीही गेले दोन दिवस बांगलादेशातील प्रत्येक हिंदू वस्तीवर जोराचे हल्ले सुरु आहेत. गुरुवारी नौखालीमधील हिंदूंची घरे जाळण्यात आली आहेत व त्या देशातील एकूण सहा मंदिरे गुरुवारी जमीनदोस्त करण्यात आली आहेत. त्याच प्रमाणे गईबांध, चित्तगाव, रंगपूर, सिल्हट, चापैनवाबगंजयेथे या हल्ल्याची तीव्रता अधिक होती. बेगमगंजयेथील बिपलॉब सरकार याचे सराफीचे दुकान लुटण्यात आले आहे. बांगला देशमुक्तीचळवळीत हजारो बांगला देशीयांना ठार मारल्याचा आरोप असलेल्या व हजारो महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या जमातनेता दिलावर हुसेन सय्यदी याला फाशीची शिक्षा सुनावल्यावर जमातच्या नेत्यांनी निषेध करण्यासाठी हिंदूंच्या घरावर हल्ले वाढविले.

चित्तगाव येथील एक शिक्षक शंकर चंद्र याने सांगितले की , वरील शिक्षा जाहीर झाल्यावर त्याच्या समाजाच्या वस्तीच्या दिशेने जमाव आला व त्यांनी त्यांच्या घरावर रॉकेल टाकून पेटते बोळे फेकले. पत्रकारांशी बोलताना शंकर चंद्र म्हणाला, बेचाळीस वर्षापूर्वी बांगला देशनिर्मितीच्या वेळी आमच्या घरावर असाच हल्ला झाला होता तेंव्हा आमचा समाज घरदार सोडून दुसर्‍या गावात आला तेंव्हापासून आम्ही कष्ट करून जगत आहोत पण आज जी स्थिती आली आहे त्यामुळे अंगावरील कपडयानिशी आज बेवारशी झालो आहोत. आज तर हिदूवर पुन्हा हल्ले व अत्याचार सुरु झाले आहेत.

बेगमगंजचे सहाय्यक पोलीस आयुक्त मेहबूब आलम यांनी सांगितले की, काही मोहल्ल्यांना आगी लागल्यावर तेथे अग्निशमनदलाचे बंब आणि जवान गेले होते पण त्यांना तेथे कामही करू दिले जात नव्हते. तरीही आम्ही आग विझवण्याचे काम सुरु ठेवल्यावर आमच्यावर गोळया झाडण्यात आल्या. चित्तगाव येथील बांशखलीची हिंदू वस्ती आणि सतकानिया बौद्ध मंदीर यांना आगी लावण्यात आल्या. तेथूनच जवळ असलेल्या महाजनपुरा आणि धोपपुरा या हिदूसमाजातील वस्तीवर मोठे हल्ले झाले. चित्तगावच्याच कैलासपुरा वसाहतीवरही जोराचे हल्ले करण्यात आले.

सुंदर गंज, ठाकूरगाव, लक्ष्मीपूर आणि चापेन नवाबगंजयेथील हिंदूवस्तीवरही हल्ले झाले. ढाका महानगरी पूजा समितीचे सचिव निर्मल चतर्जी यांनी सांगितले की, सरकारकडे आम्ही सुरक्षिततेची मागणी केली आहे.

Leave a Comment